एकदाच नव्हे पुन्हा पुन्हा वापरा, प्रजासत्ताक दिनी द्या खास नॅपकिन बुके, किंमत फक्त 40 रुपये!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला जातो. त्यासाठी फुलांची बुके आणली जातात. फुलांची बुके तर तुम्ही नेहमीच वापरता. यावर्षी काही वेगळं म्हणून तुम्ही इको फ्रेंडली नॅपकिन बुके वापरू शकता.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : वर्षाच्या सुरुवातीपासूनच सण समारंभाला सुरुवात होते. मकर संक्रांती झाली, आता प्रजासत्ताक दिनाला काहीच दिवस उरलेत. सर्वत्र प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला जातो. त्यासाठी फुलांची बुके आणली जातात. फुलांची बुके तर तुम्ही नेहमीच वापरता. यावर्षी काही वेगळं म्हणून तुम्ही इको फ्रेंडली नॅपकिन बुके वापरू शकता. अमरावतीमधील दस्तुर नगर चौक येथे तुम्हाला अगदी 40 रुपयांपासून बुके मिळतील.
advertisement
अमरावतीमधील रेवती सवई या होलसेल नॅपकिन बुकेचा व्यवसाय करतात. रेवती सवई सांगतात की, नॅपकिन बुके हे इको फ्रेंडली असल्याने कधीही परवडणारे आहेत. एकदा घेतल्यानंतर त्यातील नॅपकिन तुम्ही वापरू शकता किंवा बुके जसाच्या तसा ठेऊन देऊ शकता. याला फेकण्याची गरज नाही.
advertisement
बुके किती रुपयांपासून मिळतात?
रेवती सांगतात, आमच्याकडे तुम्हाला 40 रुपयांपासून बुके मिळतील. 40 रुपयांच्या बुकेमध्ये 1 नॅपकिन असतो जो 8×8 चा असतो. 50 रुपयांच्या बुकेमध्ये सुद्धा 1 नॅपकिन असतो तो 12×12 चा असतो. त्यानंतर बुकेचा आकार आणि नॅपकिन वाढत जाईल तशी किंमत सुद्धा वाढत जाईल. 300 रुपयांच्या नॅपकिन बुकेसाठी 12×12 चे 5 नॅपकिन वापरले जातात. त्याचबरोबर 700 रुपयांच्या बुकेसाठी 30×60 चा 1 टॉवेल आणि 12× 12 चे 5 नॅपकिन वापरले जातात.
advertisement
1400 रुपयांच्या बुकेमध्ये 30×60 चे 2 टॉवेल आणि 7 नॅपकिन वापरले असतात. 100 आणि 150 रुपयांना सुद्धा आकर्षक बुके आमच्याकडे उपलब्ध आहे. टॉवेल आणि नॅपकिन वापरून आमच्याकडे आकर्षक असे नॅपकिन बुके तयार केले जातात. महिलांना व्यवसाय करायचा असल्यास होलसेल नॅपकिन बुके सुद्धा आमच्याकडे मिळतील. तुम्हाला हवे असल्यास स्पेशल ऑर्डर प्रमाणे सुद्धा आम्ही बुके बनवून देतो, असे रेवती सवई यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
January 18, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एकदाच नव्हे पुन्हा पुन्हा वापरा, प्रजासत्ताक दिनी द्या खास नॅपकिन बुके, किंमत फक्त 40 रुपये!