Konkan Railway: कोकण रेल्वेचं महत्त्वाचं अपडेट, सहा दिवस वेळापत्रकात बदल, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Konkan Railway: कोकण रेल्वेकडून महत्त्वाचं अपडेट आहे. सहा दिवस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
मुंबई: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवा–पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकात दोन नवीन क्रॉसओव्हर कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने 10 ते 15 डिसेंबरदरम्यान प्री-एनआय आणि एनआय ब्लॉक घोषित केला आहे. या तांत्रिक कामामुळे कोकण मार्गावरून मुंबईकडे धावणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पुढील सहा दिवस हे बदल लागू राहणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या प्रस्थानवेळेत विलंब होणार आहे. मडगाव–मुंबई CSMT एक्स्प्रेस (20112) ही गाडी 30 मिनिटे उशिरा सुटेल. तिरुवनंतपुरम नॉर्थ–एलटीटी एक्स्प्रेस 60 मिनिटे उशिरा धावेल, तर मंगळुरू–मुंबई CSMT एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावणार आहे. तळोजा पाचनंद येथे सुरू असलेल्या क्रॉसओव्हर कमिशनिंगमुळे सिग्नल आणि मार्गरचना सुधारण्यासाठी ही वेळ आवश्यक असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
advertisement
यानंतर 14 डिसेंबरला सुटणारी मडगाव–मुंबई CSMT एक्स्प्रेस (20112) पुन्हा एकदा 60 मिनिटांनी नियंत्रित करण्यात येणार आहे. तसेच 15 डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई CSMT–मडगाव एक्स्प्रेस (10103) ही गाडी 30 मिनिटांनी उशिराने रवाना होईल. सध्या सुरू असलेल्या कामामुळे मार्गावरील गाड्यांची क्रॉसिंग क्षमता आणि वाहतूक सुरळीतता वाढणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
advertisement
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या दिवसांमध्ये प्रवास करणार असल्यास वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी स्टेशनवर वेळेआधी पोहोचून गाडीची सुधारित वेळ तपासावी जेणेकरून गैरसोय होणार नाही. तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेची गती, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: कोकण रेल्वेचं महत्त्वाचं अपडेट, सहा दिवस वेळापत्रकात बदल, कारण काय?










