त्याला मरायचं होतं, रेल्वे पुलावर उडी मारली अन्..., मरणाच्या दारात ‘देवदूत’ आडवा आला, छ. संभाजीनगरात काय घडलं?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: निवासी डॉक्टरांनी तरुणाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. अभ्यासाच्या ताणामुळेच मुलाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे वडिलांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर: अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने रेल्वेस्टेशनच्या पुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली; मणका, डावी मांडी तसेच दोन्ही पायांच्या घोट्यांना फ्रॅक्चर झाले. अत्यवस्थ अवस्थेत त्याला घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. आता डॉक्टरांच्या प्रयत्नांनी तो स्वतःच्या पायावर उभा राहत आहे.
27 वर्षांच्या तरुणावर सुरुवातीला आयसीयूमध्ये आणि त्यानंतर अस्थिव्यंगोपचार विभागात सुमारे साडेतीन महिने सलग उपचार सुरू राहिले. टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया व पुनर्वसनामुळे हा तरुण आता बरा होत असून पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोय. हा तरुण मूळचा विशाखापट्टणम येथील रहिवासी आहे.
advertisement
30 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मणक्याला इजा झाल्याने त्याच्या पायांची ताकद कमी झाली होती. अधिष्ठात्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचार विभागाच्या पथकाने मणका, मांडी व घोट्यांवर आवश्यक शस्त्रक्रिया करून उपचार केले. भूलतज्ज्ञ, ओटी व वॉर्ड कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी महत्त्वाची साथ दिली.
दरम्यान, निवासी डॉक्टरांनी तरुणाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. अभ्यासाच्या ताणामुळेच मुलाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे वडिलांनी सांगितले. विशाखापट्टणम येथून तो कसा येथे पोहोचला, हे कुटुंबालाही ठाऊक नव्हते. “घाटीतील डॉक्टरांच्या वेळीच व कुशल उपचारांमुळे आमचा मुलगा वाचला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 2:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
त्याला मरायचं होतं, रेल्वे पुलावर उडी मारली अन्..., मरणाच्या दारात ‘देवदूत’ आडवा आला, छ. संभाजीनगरात काय घडलं?








