advertisement

'देवमाणूस'मध्ये नवा व्हिलन? आर्याचा मृतदेह फ्रिजमध्ये, लाली-गोपाळ दोघांनाही माहिती नव्हतं, मग ती तिसरी व्यक्ती कोण?

Last Updated:

Devmanus : आता नव्या प्रोमोमध्ये आर्याची डेडबॉडी पोलीस जामकरच्याच घरात फ्रिजमध्ये सापडल्याचं दाखवण्यात आलं आहे. आर्याचा शोध संपणार असला तरी, खऱ्या खुन्यापर्यंत पोलीस पोहोचणार की पुन्हा एकदा 'देवमाणूस' आपली चाल खेळणार?

News18
News18
देवमाणूस मालिकेमध्ये सध्या अनेक कोडी पडली आहेत. प्रेक्षकांची उत्सुकताही वाढली आहे. प्रत्येक भाग प्रेक्षकांना सुन्न करून सोडत आहे. पोलीस जामकरची बहीण आर्याचा खून झाला पण हा खून कुणी केला आणि तिची डेडबॉडी कुठे आहे, या प्रश्नांनी आधीच गोंधळ उडवून दिला होता. आता समोर आलेल्या प्रोमोने तर साऱ्यांचीच झोप उडवली आहे. जामकरच्या घरातूनच आर्याचा मृतदेह सापडल्याने मालिकेच्या कथानकाला आता एक अत्यंत भयानक वळण मिळालं आहे.
गावाच्या जत्रेदरम्यान लाली आर्याला पळून जाताना पकडते. या दोघींमध्ये झटापट होते. जामकरला आर्या हरवल्याचं समजतं. तिचा फोन बंद येतो. दोन वेळा जामकर अगदी तिच्या जवळ पोहोचलेला असतो, मात्र तरीही ती त्याला सापडत नाही. लाली आर्याला जामकरपर्यंत पोहोचू देत नाही. यानंतर गोपाळला आर्या मेलेली सापडते, तेव्हा तिची विल्हेवाट लावण्यासाठी तो तिला घेऊन जातो. मात्र तिथंच नव्या खेळाला सुरुवात होते. डेडबॉडी तिथून गायब झाल्याचं दाखवलं आहे.
advertisement
लालीचा सूड पूर्ण, पण गोपाळ 'बळीचा बकरा'?
आता नव्या प्रोमोमध्ये आर्याची डेडबॉडी पोलीस जामकरच्याच घरात फ्रिजमध्ये सापडल्याचं दाखवण्यात आलं आहे. गोपाळ जेव्हा प्रेग्नन्सीचे रिपोर्ट शोधण्यासाठी जामकरच्या घरात शिरतो, तेव्हा तिथे आर्याची डेडबॉडी फ्रिजमध्ये पाहून त्याचे धाबे दणाणतात. गोपाळ ती डेडबॉडी तिथून हलवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तो या प्रकरणात अडकणार नाही. पण त्याच वेळी जामकर घरी पोहोचतो. फ्रीजमधून काढलेल्या आर्याच्या मृतदेहावरून पाणी टपकायला सुरुवात होते.
advertisement
पाणी टपकायला लागलं अन् काळजाचा ठोका चुकला!
आता जामकरला आपल्याच घरात आपल्या बहिणीचा मृतदेह सापडणार का? लालीने आर्याचा खून केला, गोपाळने डेडबॉडी उचलली, जामकरला सत्य समजणार का? खूनाच्या जागी आणि डेडबॉडी सोबत सापडल्यामुळे गोपाळच मुख्य आरोपी ठरेल का? आणि ती पुन्हा चोरून जामकरच्या फ्रीजमध्ये ठेवणारी ती तिसरी व्यक्ती किंवा तिसरा व्हिलन कोण?  हा प्रश्न प्रेक्षकांना अस्वस्थ करत आहे.
advertisement
लालीने आपला बदला तर पूर्ण केला, पण या खुनाचं पाप आता कोणाच्या पदरात पडणार, हे पाहणं रंजक ठरेल. आर्याचा शोध संपणार असला तरी, खऱ्या खुन्यापर्यंत पोलीस पोहोचणार की पुन्हा एकदा 'देवमाणूस' आपली चाल खेळणार? हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'देवमाणूस'मध्ये नवा व्हिलन? आर्याचा मृतदेह फ्रिजमध्ये, लाली-गोपाळ दोघांनाही माहिती नव्हतं, मग ती तिसरी व्यक्ती कोण?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement