advertisement

Mumbai Metro: मुंबई मेट्रोबद्दल मोठी बातमी, Metroच्या वेळापत्रकात बदल, या स्थानकांवर होणार परिणाम

Last Updated:

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रोच्या लाईन 2A आणि 7 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रोच्या लाईन 2A आणि 7 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 ही 12 डिसेंबर रोजी नेहमीपेक्षा एक तास उशिराने सुरू होईल. या मार्गावरील गाड्या सकाळी 6 ऐवजी सकाळी 7 वाजता सुरू होतील, असे मुंबई मेट्रोकडून अधिकृत पणे कळवण्यात आले आहे.
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या कार्यालयातील पथकाला महत्त्वाची तपासणी करण्याची परवानगी देण्यासाठी कामकाजात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे, असे आवाहन मुंबई मेट्रोकडून करण्यात आले आहे.
advertisement
मेट्रो मार्गिका 7 आणि मेट्रो मार्गिका 9 (फेज 1) दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळण्यापूर्वी तपासणी आवश्यक आहे. त्यात आवश्यक सिस्टम इंटिग्रेशन तपासणी आणि सुरक्षा चाचण्यांचा समावेश असेल. हे टप्पे अंधेरी (पूर्व) ते मीरा भाईंदरपर्यंत थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत, ज्यामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक सहज आणि सोयीस्कर प्रवास मिळण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबई मेट्रोबद्दल मोठी बातमी, Metroच्या वेळापत्रकात बदल, या स्थानकांवर होणार परिणाम
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement