TRENDING:

Black vs Green Grapes: काळे द्राक्षे चांगले की हिरवे? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?

Last Updated:

काळे द्राक्षं चांगले की हिरवे हे प्रत्येकासाठीत नेहमी विचार करण्याचा विषय राहिला आहे. कोणतं खरेदी करु यासाठी नेहमीच जास्त वेळ जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : मार्केटमध्ये विविध प्रकारची फळे विकण्यासाठी असतात. त्यामुळे खरेदी करायला गेल्यावर बऱ्याचदा गफलत होते. कोणतं खरेदी करु आणि कोणतं नाही यामध्य्ये कन्फुजन होतं. खास करुन द्राक्षांमध्ये. काळे द्राक्षं चांगले की हिरवे हे प्रत्येकासाठीत नेहमी विचार करण्याचा विषय राहिला आहे. कोणतं खरेदी करु यासाठी नेहमीच जास्त वेळ जातो. मात्र काळ्या आणि हिरव्या द्राक्षांमध्ये कोणती द्राक्षं आरोग्यासाठी चांगली आहेत हे तुम्हाला माहितीय का?
काळे द्राक्षे चांगले की हिरवे? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?
काळे द्राक्षे चांगले की हिरवे? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?
advertisement

सध्या बाजारात द्राक्षांची आवक पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये हे चांगलंच लोकप्रिय असून लोक आवर्जुन याची खरेदी करत असतात. द्राक्ष फक्त खायलाच रुचकर नसतात, तर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांनीही भरपूर असतात.

Eating Habits : तुम्हाला जेवताना आहे बडबड करण्याची सवय? वेळीच थांबवा, नाहीतर.....

दोन्ही प्रकारच्या द्राक्षांमध्ये नैसर्गिक शर्करा असते, परंतु काळ्या द्राक्षांमधील फायबर सामग्री इतर द्राक्षांच्या जातींपेक्षा रक्तातील साखरेची पातळी अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत करू शकते. काळ्या द्राक्षांमध्ये इतर द्राक्षांच्या जातींपेक्षा जास्त पॉलिफेनॉल असतात, जे त्यांच्या संभाव्य दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमध्ये येतात. जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

advertisement

काळ्या द्राक्षांमध्ये सामान्यत: रेझवेराट्रोल सारख्या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे केवळ हृदयाला निरोगी बनवत नाही तर शरीराला इतर फायदे देखील देतात. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के सारख्या काही पोषक घटकांचे प्रमाण थोडे जास्त असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Black vs Green Grapes: काळे द्राक्षे चांगले की हिरवे? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल