TRENDING:

Ambat Batata Recipe : अभिनेत्री अश्विनी काळसेकरची आवडती आंबट बटाटा करी; तुम्हालाही आवडेल सोपी रेसिपी

Last Updated:

Ashwini Kalsekar's Favorite Ambat Batata Curry Recipe : ही भाजी बनवणं अगदी सोपं आहे. ही भाजी खूप कमी वेळेत, कमी साहित्य आणि मेहनतीमध्ये तयार होते. आज पण या भाजीची रेसिपी पाहणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री अश्विनी कळसेकर यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आवडत्या महाराष्ट्रीयन भाजीबद्दल सांगितले आहे. त्यांची आवडती भाजी आहे आंबट बटाटा. ही भाजी बनवणं अगदी सोपं आहे. ही भाजी खूप कमी वेळेत, कमी साहित्य आणि मेहनतीमध्ये तयार होते. आज पण या भाजीची रेसिपी पाहणार आहोत.
अश्विनी काळसेकर यांची आवडती आंबट बटाटा रेसिपी
अश्विनी काळसेकर यांची आवडती आंबट बटाटा रेसिपी
advertisement

आंबट बटाटा ही भाजी सोपी तर आहेच. शिवाय ती मुलांनाही आवडेल त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय नक्की कर. अभिनेत्री अश्विनी काळसेकरची ही रेसिपी शेअर केली आहे nusta_potoba या अकाऊंटवर. चला पाहूया आंबट बटाटा कसा बनवायचा.

आंबट बटाटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

- ओलं नारळ

- हळद

- चिंच

advertisement

- बटाटा

- हिंग

- मोहरी

- धणे

- धणेपूड

- मीठ

- पाणी

- तेल

आंबट बटाटा बनवण्याची कृती..

- सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ, धणे, चिंच आणि हळद टाकून याची बारीक पेस्ट बनवा.

- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्या आणि गरम करा.

- तेल गरम झाल्यानंतर त्यात मेथीचे दाणे, मोहरी, हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि धणेपूड टाका.

advertisement

- यानंतर त्यामध्ये चिरलेले बटाटे आणि मीठ घालून चांगले परतून घ्या.

- आता यामध्ये पाणी टाकून बटाटे शिजवून घ्या.

- बटाटे शिजत आले की त्यामध्ये तयार केलेली नारळाची पेस्ट घाला.

अशाप्रकारे ही आंबट तिखट बटाटा भाजी तयार होते. ही रेसिपी फॉलो करून काही वेळात तुमची भाजी तयार होईल. तर एकदा घरी नक्की ट्राय करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ambat Batata Recipe : अभिनेत्री अश्विनी काळसेकरची आवडती आंबट बटाटा करी; तुम्हालाही आवडेल सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल