दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त -
आवळ्यामध्ये असलेले जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ डोळ्यांसाठी चांगलं आहे. आवळा रोज खाल्ल्यानं दृष्टी सुधारण्यास मदत होते.
रोग प्रतिकारशक्ती -
आवळ्यामध्ये असलेलं जीवनसत्त्व क हा शरीरासाठी चांगला स्रोत मानला जातो. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
advertisement
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
आवळ्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आवळ्यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त -
आवळा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता.
मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त -
आवळा इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. आवळ्याच्या सेवनामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या आहारात आवळ्याचा अनेक प्रकारे समावेश करू शकतात. आवळ्यातील क जीवनसत्त्वामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. यामुळे स्वादूपिंडाचं कार्य सक्रिय राहून इन्सुलिनचं उत्पादनही सक्रिय राहण्यात मदत होते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
पचनासाठी उपयुक्त -
आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही आवळा खाऊ शकता, आवळा खाणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
केसांसाठी फायदेशीर -
आवळा केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप चांगला मानला जातो. केसांना चमकदार आणि मजबूत बनवण्यासाठीही आवळा उपयुक्त आहे.अनेक जण केसांच्या वाढीसाठी पोषक म्हणून आवळ्याच्या तेलाचा वापर करतात.