महिलांमध्ये वाढतोय स्तनाचा कर्करोग, नेमकी काय आहेत यामागची कारणे?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
breast cancer - या कर्करोगाला नेमकी कोणती कारणे जबाबदार आहेत, तसेच हा कर्करोग कसा ओळखावा, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. ऑन्कोसर्जन डॉ. संजय अहिरे यांनी याबाबत माहिती दिली.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - भारतासह जगभरात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारामुळे जगभरात 6 लाख 85 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. या कर्करोगाला नेमकी कोणती कारणे जबाबदार आहेत, तसेच हा कर्करोग कसा ओळखावा, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
ऑन्कोसर्जन डॉ. संजय अहिरे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. संजय अहिरे हे संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग विभागात कार्यरत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, स्त्रियांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत होत असल्याने स्तनाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. हा कर्करोग 40 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे. वातावरणात होणारे बदल, अन्न व वातावरणातील प्रदूषण, बदलती जीवनशैली यासारखे घटक हे कर्करोगाच्या वाढीची प्रमुख कारणे आहेत, असे ते म्हणाले.
advertisement
जगभरातील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे. या आजाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. तसेच जगातील वैज्ञानिक या रोगाच्या कारणांचा अभ्यास करत आहे. कर्करोगाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणीय, अनुवांशिक जीवनशैली घटकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. भारताचा विचार केला असता, अलीकडच्या वर्षांत गर्भाशयाच्या कर्करोगाला मागे टाकत, स्तनाच्या कर्करोगाने उच्चांक गाठला आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांनाही हा कर्करोग मोठ्या प्रकरणात होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
advertisement
काय आहे स्तनाच्या कर्करोगाची कारणे :
स्तनाचा कर्करोग हा एक जटिल आजार आहे, ज्याचे निश्चित कारण सांगता येत नाही. मात्र, वैज्ञानिक संशोधनातून काही तत्थे समोर आली आहे. कर्करोगाला अनुवांशिक, हार्मोनल, पर्यावरणीय आणि जीवनशैली घटक जबाबदार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वात जोखीम घटकांपैकी एक म्हणजे अनुवांशिक घटक असल्याचे सांगितले जाते.
advertisement
BRCA1 आणि BRCA2 जनुकांमधील उत्परिवर्तनमुळे कर्करोगाचा धोका 65-85% पर्यंत वाढतो आहे. स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या स्त्रियांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. मासिक पाळी, स्त्रियांना 30 वर्षांनंतर मूल झालेलं मूल देखील कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते. त्याच बरोबर जीवनशैलीही महत्त्वाची आहे.
दीड एक शेतीतून तब्बल 6 लाखांचं उत्पन्न, बीडच्या शेतकऱ्यानं केली कमाल!
लठ्ठपणा आणि मद्यपान यांचा स्तनाच्या कर्करोगाशी संबंध आहे. धूम्रपान, खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव या सर्व गोष्टी स्तनाच्या कर्करोगाची जोखम वाढवतात. तर जगभरातील 30-40% कर्करोगाची प्रकरणे जीवनशैलीत बदल करून टाळता येऊ शकतात.
advertisement
पर्यावरणीय किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यास कर्करोगाधा धोका वाढतो. विशेषत: यौवनकाळात जेव्हा स्तनाची ऊती अत्यंत संवेदनशील असते, तेव्हा किरणोत्सर्गामुळे स्तनाच्या कर्करोग होण्याचा धोका असतो. काही अभ्यासकांनी असेही सुचवले आहे की, कीटकनाशके आणि प्लॅस्टिकमध्ये आढळणारी काही रसायने, अंतःस्रावी-विघटनकारी संयुगे यांचा संपर्क स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीला जबाबदार आहे.
आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत पाणी पिण्यासाठी प्लास्टिक बॉटल्सचा उपयोग करतो. हा देखील सर्वात मोठा घटक कर्करोगाला जुळत आहे. तसेच आपल्या शरीरात न दुखणारी एखादी गाठ अथवा मासाचे तुकडे असले तरी ते या कर्करोगाची शक्यता दर्शवतात. अशी एखादी गाठ आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती डॉ. संजय अहिरे यांनी यावेळी दिली.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 02, 2024 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
महिलांमध्ये वाढतोय स्तनाचा कर्करोग, नेमकी काय आहेत यामागची कारणे?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती