जिऱ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट, फायबर आणि इतर पोषक घटक असतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढताे. केवळ पचनासाठी नाही तर शरीरातील चरबी कमी करण्यासाठी याची मदत होते. याच्या नियमित सेवनानं तुम्हाला तंदुरुस्त वाटेल.
कानातील मळ काढण्यासाठी Earbuds किती सुरक्षित? काय आहे सोपी पद्धत
जिरं पाणी -
एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. या उपायानं पोटाची चरबी तर कमी होतेच पण पचनशक्तीही सुधारते.
advertisement
जिरा पावडर -
जिरं हलकं परतून घ्या आणि बारीक करून पावडर करा. ही पावडर सकाळी कोमट पाण्यासोबत प्या. वजन कमी करण्याबरोबरच पचन सुधारण्यासाठीही हा चांगला पर्याय आहे.
Navratri Fast Tips: तुम्हीही उपवासात बाजारातील हा बनावट साबुदाणा खाताय? कशी कराल ओळख?
जेवणात जिऱ्याचा वापर करा -
रोजच्या जेवणात जिऱ्याचा वापर करा. डाळी, भाज्यांमध्ये ते वापरल्यानं जेवणाची चव वाढेल आणि तुमच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर आहे.
जिरे-लिंबू पाणी -
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरं पूड आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण सकाळी घ्या, यामुळे चयापचय वेगानं होईल आणि यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होईल.
या व्यतिरिक्त इतरही अनेक पर्याय वापरुन वजन कमी करु शकता.
नियमित व्यायाम करा. पुरेसं पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
साखर आणि प्रक्रिया केलेलं अन्न टाळा, कारण त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. फायबर युक्त अन्न खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट भरलेलं राहतं. जिऱ्याचा योग्य वापर केला तर तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. यासोबतच नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेण्यावर लक्ष द्या. तुम्हाला लवकरच तुमच्या शरीरात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तब्येतीची काळजी घ्या.