TRENDING:

Male Fertility : मेल फर्टिलिटी वाढवण्यासाठी उपयोगी ठरते 'ही' औषधी वनस्पती, अशा प्रकारे करा सेवन

Last Updated:

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेविषयी बोलण्यास अनेकजण कचरतात आणि योग्य उपचार न घेतल्याने गुंतागुंत अधिकच वाढते. अशावेळी प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लग्न झाल्यावर काही वर्षांनी प्रत्येक जोडप्याला आई वडील होण्याची इच्छा असते. परंतु अनेकदा अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर याचा परिणाम होतो. परंतु पुरुषांच्या प्रजनन क्षमतेविषयी बोलण्यास अनेकजण कचरतात आणि योग्य उपचार न घेतल्याने गुंतागुंत अधिकच वाढते. अशावेळी प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
मेल फर्टिलिटी
मेल फर्टिलिटी
advertisement

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार गिलोय म्हणजेच गुळवेल ही पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. या वनस्पतीमध्ये गिलोइन नावाचे ग्लूकोसाइड आणि टीनोस्पोरिन, पामेरिन आणि टीनोस्पोरिक एसिड असते. याशिवाय गुळवेलमध्ये फॉस्फोरस, कॉपर, आयरन, झिंक, मॅगनीज आणि कॅल्शियमचे चांगले प्रमाण आढळते. तेव्हा लग्न झालेल्या पुरुषांनी या वनस्पतीचे सेवन का आणि कसे करावे याविषयी अधिक माहिती घेऊयात.

advertisement

गुळवेलच्या सेवनाचे फायदे :

शुक्राणूंची संख्या वाढते : लग्न झाल्यावर जर पुरुषांना वडील व्हायचे असेल तर त्यासाठी त्यांच्या सीमेनमध्ये पर्याप्त शुक्राणूंची संख्या असणे आवश्यक असते. अनेकदा पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याने महिला गरोदर राहू शकत नाहीत. तेव्हा गुळवेलचे सेवन केल्याने पुरुषांना फायदे मिळू शकतात.

Coffee : रोज किती कप कॉफी पिणे योग्य? अतिसेवनाने होऊ शकतात गंभीर आजार

advertisement

शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते : गर्भधारणेसाठी शुक्राणूंची संख्या फक्त जास्त असून चालत नाही तर त्याची गुणवत्ता देखील चांगली असायला हवी. तेव्हा नियमितपणे गुळवेलचे सेवन केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारु शकते.

शारीरिक क्षमता सुधारते : जे पुरुष नियमित गुळवेलचे सेवन करतात त्यांची शारीरिक क्षमता सुधारण्यास मदत होते. गुळवेलमध्ये अँटी डिप्रेसेंट गुण आढळतात जे मनाला शांत ठेवतात आणि मानसिक ताण दूर करतात.

advertisement

Sabudana khichdi : रात्री साबुदाना भिजवायला विसरलात? टेन्शन नाही, 10 मिनिटांत अशी बनवा चवदार खिचडी

टेस्टोस्टेरोन लेव्हल सुधारते : पुरुषांमध्ये असलेल्या सेक्स हार्मोनला टेस्टोस्टेरोन असे म्हणतात. याची लेव्हल जेवढी जास्त असेल तेवढी पुरुषांची प्रजनन क्षमता चांगली आहे असे मानले जाते. जर तुम्ही नियमित गुळवेलचे सेवन करत असाल तर टेस्टोस्टेरोन लेव्हल सुधारते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अलंकापुरीची इंद्रायणी की ‘फेस’गंगा? Video पाहाल तर आळंदीकरांसारखंच बोलाल!
सर्व पहा

(सदर मचकूर हा इंटरनेटवर दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा गुळवेलचा आहारात समावेश करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Male Fertility : मेल फर्टिलिटी वाढवण्यासाठी उपयोगी ठरते 'ही' औषधी वनस्पती, अशा प्रकारे करा सेवन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल