advertisement

Coffee : रोज किती कप कॉफी पिणे योग्य? अतिसेवनाने होऊ शकतात गंभीर आजार

Last Updated:

काही जण मरगळ घालवण्यासाठी कॉफी पितात, पण प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पिणंदेखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

कॉफी
कॉफी
देशात चहाप्रेमी जितके आहेत, तितकेच आता कॉफीलव्हर्सही वाढतायत. कॉफी मनाला तरतरी आणते. त्यामुळेही काही जण मरगळ घालवण्यासाठी कॉफी पितात, पण प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पिणंदेखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. साधारणपणे किती कॉफी पिणं आरोग्यासाठी योग्य ठरू शकतं?
कॉफी आवड म्हणूनही प्यायली जाते आणि आजकाल स्टाईल म्हणूनही प्यायली जाते. मर्यादित प्रमाणात घेतली, तर कॉफी शरीराला त्रासदायक ठरत नाही, पण प्रमाणाबाहेर सेवन केलं तर नक्कीच त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
किती कॉफी प्यावी?
तज्ज्ञांच्या मते, रोज 400 मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेणं योग्य नसतं. एका कॉफीमध्ये सरासरी 95 मिलीग्रॅम कॅफेन असतं. म्हणजे दिवसाला चार कप कॉफी तुम्ही पिऊ शकता, मात्र त्यापेक्षा जास्त कॉफी त्रासदायक ठरू शकते. चार ते सहा वर्षांच्या मुलांसाठी हे प्रमाण 45 मिलीग्रॅम आणि सात ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 70 मिलीग्रॅम आहे. किशोरवयीन मुलं अभ्यास करताना जागरणासाठी कॉफी पितात, मात्र त्यांनी दोन कप म्हणजे 100 ते 200 मिलीग्रॅम कॉफी पिणं योग्य असतं.
advertisement
कॉफी प्यायल्यावर कॅफेन 15 मिनिटांतच तुम्हाला सक्रिय करतं. मात्र जितक्या वेगानं ते शरीरात जातं, तितकाच जास्त वेळ बाहेर पडायला लावतं. अर्ध कॅफेन घालवायला शरीराला तीन ते पाच तास लागतात, 75 टक्के घालवायला सहा तास तर पूर्ण कॅफेन शरीराबाहेर काढायला 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
advertisement
कॅफेनचे परिणाम
उच्च रक्तदाब असेल, तर कॅफेनचं अतिसेवन धोकादायक ठरू शकतं. कॅफेन ताबडतोब ऊर्जा देतं, त्यामुळे उच्च रक्तदाब असेल, तर रक्तदाब लगेचच वाढू शकतो. याचमुळे हृदयरोगाचा धोकाही उत्पन्न होऊ शकतो. कॉफीच्या अतिरिक्त सेवनानं शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांनाही वेगानं काम करावं लागतं. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाचे आजार उद्भवू शकतात. कॉफीचं अतिसेवन पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. जास्त कॉफी प्यायल्याने पोटात गॅस्ट्रिक हॉर्मोन जास्त तयार होतात. यामुळे गॅसेस, पित्त, डायरिया अशा आजारांचा धोका वाढतो.
advertisement
झोप लवकर न लागण्याची समस्या ज्यांना आहे, अशांनी जास्त कॉफी पिऊ नये. कॅफेनमुळे झोपेला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आधीपासून झोप न येण्याची समस्या असेल, तर कॉफी प्यायल्यानं ती समस्या गंभीर होऊ शकते. कॉफीचं अतिसेवन हाडांच्या आरोग्यासाठीही चांगलं नसतं. यामुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते.
advertisement
कॉफी पिण्यासाठी सकाळची वेळ चांगली असते. झोपेतून उठल्यावर ऊर्जा कमी असते, त्यामुळे इन्स्टंट एनर्जीसाठी कॉफी पिणं हा चांगला पर्याय असतो. त्याशिवाय दुपारी चारच्या आसपासही कॉफी पिता येऊ शकते, मात्र रात्री किंवा मध्यरात्री कॉफी पिणं शक्यतो टाळावं. यामुळे निद्रानाश होऊ शकतो. सतत कॉफी पिणाऱ्यांसाठी ही धोक्याची सूचना आहे. भविष्यातला धोका टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीतून कॉफीचं अतिसेवन कमी केलं पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Coffee : रोज किती कप कॉफी पिणे योग्य? अतिसेवनाने होऊ शकतात गंभीर आजार
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement