advertisement

Toothbrush : किती दिवसांनी बदलायला हवा टूथब्रश? एक चूक पडू शकते महागात, 90 टक्के लोकांना माहित नाही

Last Updated:

टूथब्रश तुमचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो. परंतु काहीवेळा हाच टूथब्रश आजारपणाचे कारण देखील ठरु शकतो.

किती दिवसांनी बदलायला हवा टूथब्रश? एक चूक पडू शकते महागात
किती दिवसांनी बदलायला हवा टूथब्रश? एक चूक पडू शकते महागात
कोणी व्यक्ती समोर आल्यास जर आपल्याला त्याच्यातील कोणती गोष्ट आकर्षित करीत असेल तर ती म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील हास्य. दात जर स्वच्छ आणि पांढरे शुभ्र असतील तर ते तुमच्या हास्याला किंवा पर्सनॅलिटीला आणखीनच सुंदर बनवते.  शारीरिक स्वच्छते सोबतच ओरल हायजीन म्हणजेच तोंडाची स्‍वच्‍छता चांगली ठेवणे देखील महत्वाचे असते. टूथब्रश तुमचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो. परंतु काहीवेळा हाच टूथब्रश आजारपणाचे कारण देखील ठरु शकतो. तेव्हा टूथब्रश वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेऊयात.
अनेकजण टूथब्रश जो पर्यंत खराब होत नाही तोपर्यंत त्याचा वापर करतात. अशावेळी टूथब्रशचे ब्रिसल्स तुटतात आणि त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात, जे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
किती दिवसात बदलावा टूथब्रश :
बऱ्याचदा टूथब्रश हा सर्वजण पाण्याने स्वच्छ करतात, परंतु ब्रश केवळ पाण्याने स्वच्छ होत नाही. ब्रशमध्ये तोंडातील घाण, सलाइवा इत्यादी गोष्टी अडकतात. तेव्हा टूथब्रश हा जवळपास 3 महिन्यांनी बदलायला हवा. 2 ते 3 महिन्यांनी टूथब्रशचे ब्र‍िसल्‍स कमजोर होऊ लागतात तसेच त्यात बॅक्टेरिया तयार होऊ लागतात.
advertisement
टूथब्रशवर दिसतात या गोष्टी :
तुमच्या टूथब्रशमध्ये तुम्हाला विविध प्रकारची लक्षण दिसू लागतात. ज्याला पाहून तुम्ही समजू शकता की आता टूथब्रश बदलण्याची वेळ आली आहे. ब्रशचे ब्रिसल्स कमकुवत होणे, ब्रिसल्सचा रंग बदलणे इत्यादी ब्रश बदलण्याचे संकेत देणारी लक्षण आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Toothbrush : किती दिवसांनी बदलायला हवा टूथब्रश? एक चूक पडू शकते महागात, 90 टक्के लोकांना माहित नाही
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement