हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, जीवनसत्त्वं, खनिजं, बी6, पोटॅशियम, लोह, मँगनीज आणि फायबर यांसारखे गुणधर्म आढळतात. जे शरीराला फायदेशीर आहेत. वाढत्या वजनानं हैराण असाल तर, हळद हा त्यांच्यासाठी रामबाण उपाय आहे. वाढतं वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्याचं सेवन केल्यानं तुमचं वजन झपाट्यानं कमी होईल.
advertisement
हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीच्या पाण्याचं सेवन केल्यानं मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्यामुळे आरोग्याच्या काही जुन्या समस्या असतील तर त्या दूर होतात. चुकीचा आहार आणि जीवनशैलीतल्या बदलांमुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
Sanitary Pads, Tampons की Menstrual cups? मासिक पाळीत काय वापरणं जास्त चांगलं?
हृदय आरोग्यासाठी उपयुक्त -
हृदयाच्या समस्यांचं सर्वात मोठं कारण म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल, जे आपल्या नसांमध्ये जमा होतं. हळदीचं पाणी प्यायल्यानं खराब कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
पचनासाठी उपयुक्त -
हळदीचं पाणी प्यायल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. हळदीमध्ये असलेला कर्क्यूमिन घटक पित्त काढून टाकण्यास मदत करतो, जे पचनासाठी उपयुक्त आहे. हळदीचं पाणी प्यायल्यामुळे, यकृत डिटॉक्स होतं. यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या कमी होते.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे संधिवाताच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. एवढंच नाही तर हळदीचं पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकते. त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील पेशींचं नुकसान रोखू शकतात. हळदीचं पाणी रोज प्यायल्यामुळे सूज येण्याचं प्रमाणही कमी होतं.