फॅशन आणि सौंदर्याशी निगडीत अनेक गोष्टी बाजारात नवनवीन येत असतात, ज्याचा अनेक लोक अवलंबही करतात. नुकतीच सुंदर त्वचेसाठी एक विचित्र थेरपी समोर आली आहे. या थेरपीचे नाव आहे - स्लॅप थेरपी. होय, या थेरपी अंतर्गत, तुम्हाला गालावर चापट मारावी लागेल. तर सुंदर आणि तरुण त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही ही किंमत मोजण्यास तयार आहात का?
advertisement
दक्षिण कोरियातील महिला सौंदर्यासाठी विविध थेरपीचा अवलंब करत आहेत. शंभर वर्षांपासून प्रचलित असलेली ही वेगळी पद्धत अधिक फायदेशीर असल्याचे दिसते. तसेच, स्लॅप थेरपी केल्याने चेहरा सुंदर दिसतो असे म्हणतात. गालावर मारणे याचा अर्थ जोरात मारणे असा होत नाही. दोन्ही हातांनी दोन्ही गाल मध्यम शक्तीने घासणे पुरेसे आहे.
सुरुवातीला ही थेरपी केवळ कोरियामध्ये वापरल्याचे दिसले. परंतु आता ती जगभर पसरली आहे. कारण त्याने खरोखर चांगले परिणाम दिले आहेत. गालावर चापट मारल्याने स्त्रिया अधिक सुंदर दिसतात असं म्हणतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यामागे विज्ञान आहे. गालाला मार लागल्याने चेहऱ्यावर रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे त्वचा तेजस्वी आणि मऊ होते, असे सांगितले जाते.
म्हणूनच कोरियातील महिला स्लॅप थेरपीचा अवलंब करतात. लहानपणापासूनच त्याचा सराव केला जातो. केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्याही गालावर चापट मारली जातात. असे केल्याने त्यांचे चेहरे थोडे लाल आणि फ्रेश दिसतात. स्लॅप थेरपी ही ब्युटी थेरपी मानली जाते. या झटक्याने त्वचा संवेदनशील होते. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या दिसत नाहीत. म्हणूनच कोरियन लोक म्हणतात की, या उपचारामुळे वय कमी होते. यामुळे रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणात वाढते. चेहऱ्याचे स्नायू कडक होतात. त्वचा अधिक घट्ट होते आणि आकर्षक दिसते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
