कोर्ग (कर्नाटक) : कोर्ग हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शांत डोंगरांमध्ये वसलेले सुंदर ठिकाण आहे. येथे निसर्गसौंदर्याबरोबरच जंगल स्पा, इन्फिनिटी पूल आणि खाजगी धबधबा यांचा आनंद लुटता येतो. याशिवाय, येथील ग्लास हाऊस डाइनिंग ही खासियत लग्नसोहळ्याला खास बनवते. लग्नाच्या फंक्शन्स किंवा बॅचलर पार्टीसाठी ग्लास हाऊस रेस्टॉरंट नक्की ट्राय करा.
जिम कॉर्बेट (उत्तराखंड) : हिमालयाच्या पायथ्याशी नैनीतालजवळील जिम कॉर्बेट हे निसर्गसौंदर्य आणि शांततेने भरलेले ठिकाण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात तुम्ही नदीकिनारी रोमॅंटिक डिनर, खाजगी बार्बेक्यू आणि स्पाचा आनंद घेऊ शकता. कोसी नदीच्या काठी आणि कॉर्बेट नॅशनल पार्कच्या जंगलाने वेढलेल्या या ठिकाणी लग्न सोहळा करणे ही अविस्मरणीय अनुभूती ठरू शकते.
advertisement
इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह (मुंबई) : समुद्रकिनारी डेस्टिनेशन वेडिंग करायचे असल्यास मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. येथे तुम्हाला अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. डोम रूफटॉपवर सुर्यास्ताचा आनंद घेत लग्न सोहळा साजरा करणे हे स्वप्नवत ठरू शकते.
जयपूर (राजस्थान) : डेस्टिनेशन वेडिंगसाठी जयपूरमधील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल हा शाही विवाहसोहळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. 51,000 चौरस फुटांचे बँक्वेट स्पेस आणि सुंदर बगिच्यांमध्ये लग्नसोहळा साजरा करणे हा अविस्मरणीय अनुभव ठरतो. येथे शाही भोजनव्यवस्था उपलब्ध आहे, जी लग्नसोहळ्याला अधिक खास बनवते.
भारतात डेस्टिनेशन वेडिंग का निवडावी? : निसर्गरम्य ठिकाणी विवाहसोहळा हे एक वेगळे आकर्षण देते. लग्नसोहळ्यासोबत कुटुंबीय व पाहुण्यांसाठी हा प्रवासाचा आनंदही असतो. गर्दीपासून दूर, शांत वातावरणात लग्नाचे आयोजन करता येते. ही ठिकाणे तुमच्या आयुष्यातील खास क्षण अधिक संस्मरणीय बनवतील.
हे ही वाचा : Flipkart सेलमध्ये अगदी स्वस्तात मिळतोय iPhone 15! होईल मोठी बचत
हे ही वाचा : Kharmas 2024 : या दिवसापासून सुरू होणार खरमास, चुकूनही ही 5 कामं करू नका, अन्यथा…