सागर, 21 डिसेंबर : तापमानात आता चांगलीच घट झाली असून सर्वत्र थंडी पडू लागली आहे. वाऱ्यांचा वेगही प्रचंड वाढलाय. थंडीमुळे त्वचा रखरखीत होते, अंगात कणकण जाणवते, हात-पाय आकडल्यासारखे वाटतात. खरंतर एवढी थंडी सहन करता येण्यासारखी असते. परंतु हिवाळ्यात लकवा आणि हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढतं, हे तुम्हाला माहितीये का?
मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड मेडिकल कॉलेज, सागरमधील मेडिसिन विभागाचे सहाय्यक प्रोफेसर डॉक्टर मनीष जैन यांनी सांगितलं की, श्वासासंबंधित आजार असल्यास थंडीपासून स्वतःचं विशेष संरक्षण करावं. कारण याच ऋतूत हार्ट अटॅक आणि लकव्याचं प्रमाण सर्वाधिक असतं.
advertisement
हिवाळ्यात खोकल्यामुळे होतोय छातीमध्ये त्रास तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम
थंड वातावरणात लोक सकाळी फिरायला जातात. परंतु रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी असं सकाळी फिरणं घातक आहे. आपल्या ते जीवावरही बेतू शकतं. कारण सकाळीच हार्ट अटॅक आणि लकव्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे फिरायला जायचंच नाही असं नाही परंतु जेव्हा ऊन पडायला सुरुवात होईल, तेव्हा घराबाहेर पडायचं. शिवाय श्वासासंबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी आणि वृद्धांनी जास्त काळजी घ्यावी.
दरम्यान, थंडीत अनेकजण शरीर उबदार ठेवण्यासाठी चहावर चहा पितात. परंतु उब मिळवण्यासाठी चहा व्यतिरिक्त इतरही पौष्टिक पदार्थ आपण खाऊ शकता. कारण चहाचं अति सेवन आरोग्यासाठी घातक असतं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g