बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी भारद्वाज यांच्याकडे आलेलं हे बाळ. बाळाच्या आईने सांगितलं की त्याने गेल्या 7 दिवसांपाून पॉटी केली नाही. यानंतर डॉ. माधवी यांनी यामागील कारण सांगितलं, ते म्हणजे आईचं दूध. हो तुम्ही बरोबर वाचलं, बाळाला पॉटी न होण्यासाठी कारणीभूत होतं ते आईचं दूध. आता आईचं दूध म्हणजे बाळासाठी अमृत मग त्याचा असा कसा परिणाम होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
OMG! गर्भातील बाळाने आपल्याच भावंडांना 'खाल्लं', सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात
महिलेला समजावून सांगतात डॉ. माधवी म्हणाल्या, आईच्या दुधात पॉटी तयार होण्याचं प्रमाण खूप कमी असते . दोन महिन्यांनंतर हे दूध बाळासाठी इतकं प्रभावी होतं की बाळ कितीही दूध प्यायलं तरी ते पूर्णपणे पचतं. अशा परिस्थितीत जेव्हा शरीरात कचरा तयार होत नाही, तर मूल पॉटी तयार कुठून करेल?
बालरोगतज्ञ माधवी पुढे स्पष्ट करतात की मुलामध्ये तयार होणाऱ्या विष्ठेचे प्रमाण इतकं कमी असतं की ते अजिबात कमी होत नाही. हळूहळू ते साचण्यास एक आठवडा, दहा दिवस किंवा कधीकधी 11 दिवसही लागू शकतात. तथापि जोपर्यंत बाळाचं पोट मऊ असतं आणि त्याला गॅस होत असतो, तोपर्यंत काळजी करण्याची काहीच गरज नाही.
नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?
त्यांनी पुढे सांगितलं की, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाळाला हलकी मालीश करू शकता किंवा नाभीवर कोमट तेल लावू शकता आणि थोडी सायकलिंग करू शकता, जर तुम्हाला जास्त गॅसची समस्या येत असेल तर तुम्हाला आराम मिळू शकतो.
(सूचना : लेखात दिलेली माहिती पूर्णपणे इन्स्टाग्राम रीलवर आधारित आहे. न्यूज18मराठी त्याच्या सत्यतेची, अचूकतेची आणि परिणामकारकतेची जबाबदारी घेत नाही.)