TRENDING:

Calorie Deficiency : वेटलॉससाठी तुम्ही लो कॅलरी आहार घेता? वाचा कसे ठरू शकते घातक!

Last Updated:

शरीरात कॅलरीजचे प्रमाण कमी झाल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपल्याला रोजच्या आहारात किती कॅलरीजची आवश्यकता असते आणि त्याची कमतरता भासल्यास काय नुकसान होते हे जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 23 ऑगस्ट : आपले शरीर फिट, निरोगी आणि आकर्षक असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण खूप मेहनत देखील घेतात. अनेक जण व्यायम आणि योगा करून शरीर फीट ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक आहारात आवश्यक बदल करून शरीराची काळजी घेतात. अनेक जण वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात रोजच्या आहारातून कॅलरीज कमी करतात. कारण कॅलरीजमुळे पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते.
एका दिवसात कॅलरीजची आवश्यकता?
एका दिवसात कॅलरीजची आवश्यकता?
advertisement

झिरो फिगरच्या प्रयत्नात अनेक महिला आहारात कॅलरीजचे प्रमाण कमी करतात आणि ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपल्याला रोजच्या आहारात किती कॅलरीजची आवश्यकता असते आणि शरीरात कॅलरीजची कमतरता भासल्यास काय नुकसान होते हे जाणून घेऊया.

एका दिवसात कॅलरीजची आवश्यकता?

तुम्ही किती शारीरिक काम करता यावर तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण अवलंबून असते. म्हणजेच शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तीला ऑफिसमध्ये एका जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त कॅलरीजची आवश्यकता असते.

advertisement

कॅलरीजच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान

अशक्तपणा जाणवतो : तुमच्या शरीरात कॅलरीजची कमतरता निर्माण होते तेव्हा तुमचे शरीर कमकुवत होते. कॅलरी आपल्या शरीरात इंधन म्हणून काम करतात. म्हणजेच कमी कॅलरीजमुळे तुमची ऊर्जाही कमी होते आणि थकवा जाणवू लागतो. यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि गरजेनुसार कॅलरीयुक्त पदार्थ खावे असा सल्ला देण्यात येतो.

केस आणि नखांवर परिणाम : शरीरातील कॅलरीजची कमतरता तुमच्या केस आणि नखांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमच्या एकूण सौंदर्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या केसांची गळती होऊ शकते आणि त्यामुळे टक्कल पडण्याचा धोकाही निर्माण होतो. याशिवाय नखे कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

त्वचा कोरडी होते : कॅलरीज आपल्या त्वचेसाठीही महत्त्वाच्या असतात. याबाबात फार कमी लोकांना माहिती आहे. शरीरात कॅलरीजची कमतरता असेल तर त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे फिटनेसच्या नादात शरीरात कॅलरीची कमतरता होणार नाही याकडे आवश्य लक्ष द्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Calorie Deficiency : वेटलॉससाठी तुम्ही लो कॅलरी आहार घेता? वाचा कसे ठरू शकते घातक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल