जाणून घेऊयात ओव्याच्या आरोग्यदायी फायद्याविषयी आणि त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी.
आहारतज्ज्ञ श्रद्धा श्रीवास्तव यांच्या मते ओव्यात असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे ओवा खाणं फायद्याचं ठरतं. ओव्यात प्रोटिन्स, फॅट्स, फायबर, कॅल्शियम, फायटोकेमिकल, फॉस्फरस, लोह आढळून येतं. ओव्यात नैसर्गिकरित्या अँटीसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मही आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे रोजच्या आहारात ओव्याचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांना दूर ठेवता येतं. तुम्हाला ओवा चावून खाणं आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारांनी आणि पद्धतीने ओव्याचा आहारात समावेश करू शकता.
advertisement
कोणत्या पद्धतीने ओव्याचा दैनंदिन आहारात समावेश करणं फायद्याचं ठरतं ?
ओव्याचं पाणी : आहारतज्ञांच्या मते, ओव्याचं पाणी पिण्याने विविध आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ओव्याचं पाणी पितात. यामुळे गॅसेस, ॲसिडिटी, अपचन आणि सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ओव्यात असलेले सक्रिय एंझाइम्स पचन प्रक्रियेला चालना देतात आणि गॅस्ट्रिक रसाचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे जेवण पचायला मदत होते. ज्यांना अपचानाचा त्रास आहे, त्यांनी ओव्याचं पिणं हे फायद्याचं ठरतं. तुम्ही ओव्याचं पाणी प्यायल्या सुरूवात केल्यापासून अवघ्या 1 ते 2 आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल
हे सुद्धा वाचा : Tea for Winter: हिवाळ्यात प्या ‘असा’ फक्कड चहा, थंडी पळेल दूर राहाल ताजेतवाने
ओव्याचा चहा : वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण ग्रीन टी, ब्लॅक टी पितात. तुम्हालाही जर ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिण्याची आवड असेल तर ओवा हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. चहाच्या भांड्यात गरम पाणी उकळत ठेवा. त्यात चहा पावडर ऐवजी ओव्याचे दाणे टाका. हलकीशी उकळ आल्यानंतर गाळून हा चहा प्या. ओव्याचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यापासून ते पोट साफ होण्यापर्यंत विविध फायदे तुमच्या शरीराला होतील. यात तुम्ही चिमूटभर हळद आणि आलंही किसून टाकू शकता.
ओव्याचा तडका: अनेक महिला जेवणाला चव येण्यासाठी राई किंवा जिऱ्यांचा तडका देतात. राई आणि जिरं हे आरोग्यासाठी फायद्याचं आहेच, मात्र ओव्याचा तडका ही तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. यामुळे जेवणाला वेगळी चव तर येईलच मात्र त्यासोबत आरोग्याला फायदाही होईल.
हे सुद्धा वाचा :ओवा आहे इतका शक्तिशाली; एकदा खाल्ल्याने होतील इतके फायदे
ओवा आणि लिंबाचा रसः ओव्याचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी कोमट पाण्यात भिजलेला ओवा टाकून त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी प्या. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकायला मदत होईल.