दृष्टी सुधारण्यासाठी निरोगी पदार्थांचा विचार केला जातो तेव्हा गाजरांचा उल्लेख सर्वात आधी केला जातो. गाजर खाल्ल्यानं दृष्टी सुधारते असं लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. पण त्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
गाजरं जास्त प्रमाणात खाल्ल्याचे दुष्परिणामही होतात. काही जणांनी गाजर खाणं टाळावं. गाजरांमुळे दृष्टी सुधारते असं म्हणतात. पण गाजरं हे दृष्टी सुधारण्यासाठीचं औषध नाही. त्यामुळे गाजर माफक प्रमाणात दृष्टी सुधारण्यात उपयुक्त आहे.
advertisement
Hair Care : केसांसाठी घरीच बनवा तेल, सात दिवसांत केस तुटण्याची समस्या होईल कमी
गाजरांत बीटा-कॅरोटीन असतं, ज्याचं शरीरात व्हिटॅमिन ए मधे रूपांतर होतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे.
गाजरांचा डोळ्यांवर परिणाम जाणवतो, रात्रीची दृष्टी सुधारते. डोळे कोरडे होण्यापासून वाचतात. कॉर्निया निरोगी राहतो. डोळ्यांची जळजळ आणि संसर्गापासून संरक्षण होतं.
पण एखाद्याची दृष्टी आधीच खराब असेल तर फक्त गाजर खाल्ल्यानं चमत्कारिक सुधारणा होणार नाहीत.
हा आहारातला पूरक घटक आहे, उपचार नाही. तज्ज्ञांच्या मते, गाजरांमुळे डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते, पण यामुळे चष्मा जाईल याची हमी देत नसते.
गाजरात अनेक पोषक घटक असतात, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यानं काही दुष्परिणाम होऊ शकतात:
कॅरोटेनेमिया: जास्त गाजर खाल्ल्यानं त्वचा पिवळी किंवा नारिंगी होऊ शकते. हे धोकादायक नाही, परंतु ते कुरूप असू शकते.
रक्तातील साखर वाढणं: गाजरांमधे नैसर्गिक साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी ते कमी प्रमाणात खावं.
पचनाच्या समस्या: जास्त प्रमाणात गाजर खाल्ल्यानं गॅस, पोटफुगी किंवा अपचन होऊ शकतं.
व्हिटॅमिन ए चं जास्त प्रमाण: जास्त काळ गाजर खाल्ल्यानं शरीरात व्हिटॅमिन ए चं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं किंवा उलट्या होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Vitamin D : व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता, पुरुषांमधे जाणवणात हे बदल, वेळीच व्हा सावध
गाजरं खाणं मर्यादित ठेवावं किंवा टाळावं:
मधुमेहाचे रुग्ण: गाजरांत नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.
अॅलर्जी : काहींना गाजरांपासून अॅलर्जी होऊ शकते, जसं की खाज येणं, सूज येणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं.
व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स घेणारे लोक: तुम्ही आधीच व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स घेत असाल, तर जास्त गाजरं खाणं हानिकारक असू शकतं.
कमकुवत पचनसंस्था: जास्त फायबरयुक्त आहारामुळे गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते.
गाजरं खाण्याचं योग्य प्रमाण - दररोज एक-दोन गाजरं खाणं पुरेसं आहे. कच्चं, उकडलेलं गाजर किंवा गाजराचा रस.
सॅलडमधे लिंबू आणि काळी मिरी घातल्यानं चव आणि पचन दोन्ही सुधारतं.
एक महत्त्वाचं, गाजराचा हलवा चविष्ट असतो, परंतु साखर आणि तुपाचं प्रमाण लक्षात ठेवा.
