Vitamin D : जीवनसत्त्व 'ड'च्या कमतरतेचे परिणाम, पुरुषांमधे कोणती लक्षणं आढळतात ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडं, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीची कमतरता केवळ वृद्धांमधेच नाही, तर पुरुषांमधेही ती वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पुरुषांमधे विविध शारीरिक आणि मानसिक समस्या जाणवतात. म्हणूनच, या समस्येवर वेळेवर उपाय करणं अत्यंत महत्वाचं आहे.
मुंबई : बहुतेकदा, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे महिलांना जाणवणाऱ्या समस्यांबद्दल बोललं जातं. महिलांप्रमाणेच या जीवनसत्वाची कमतरता असेल तर पुरुषांनाही काही त्रास जाणवतात.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडं, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीची कमतरता केवळ वृद्धांमधेच नाही, तर पुरुषांमधेही ती वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पुरुषांमधे विविध शारीरिक आणि मानसिक समस्या जाणवतात. म्हणूनच, या समस्येवर वेळेवर उपाय करणं अत्यंत महत्वाचं आहे.
advertisement
पुरुषांमधे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची कोणती लक्षणं जाणवतात पाहूयात -
थकवा जाणवणं: जास्त काम न करता थकवा जाणवत असेल तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. व्हिटॅमिन डी शरीरात ऊर्जेची पातळी राखण्यास मदत करतं. त्यामुळे, कमतरता असेल तर थकवा येऊ शकतो.
हाडं कमकुवत होणं : व्हिटॅमिन डी मुळे कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे पाठ, गुडघे आणि कंबर दुखू शकतात.
advertisement
केस गळणं: पुरुषांमधे केस गळण्याचं एक कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकतं. या व्हिटॅमिनमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि नवीन केसांच्या वाढ होते.
मनस्थिती : व्हिटॅमिन डी केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचं मानलं जातं.
advertisement
शरीरात जीवनसत्व ड ची कमतरता असेल तर मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मूड वाईट होणं, दुःखी वाटणं किंवा नैराश्य यांसारखी लक्षणं दिसू शकतात. अशी लक्षणं जाणवली तर वेळेवर आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D : जीवनसत्त्व 'ड'च्या कमतरतेचे परिणाम, पुरुषांमधे कोणती लक्षणं आढळतात ?