Congestion : प्रकृती स्वास्थ्यासाठी द्या तीस मिनिटं, श्वासाच्या समस्या होतील दूर, जाणून घ्या योगासनांचं महत्त्व

Last Updated:

शरीराची लवचिकता, मानसिक शांती, रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसन व्यवस्था सुधारण्यासाठी देखील योगासनं उपयुक्त आहेत. योगाभ्यास केल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, फुफ्फुसांवर आणि श्वसनमार्गावर सकारात्मक परिणाम होतो आणि ताण देखील कमी होतो.

News18
News18
मुंबई : दिवाळी संपली, ऑक्टोबर महिना आहे पण दिवसातून काही वेळ ऊन आणि काही वेळ पाऊस असं वातावरण आहे. अशावेळी, प्रकृतीची काळजी घेणं हे एक आव्हान आहे. या बदलत्या वातावरणात श्वसनाच्या समस्या वाढू शकतात.
तब्येत चांगली ठेवायची असेल तर प्रकृतीसाठी वेगळा वेळ देणं गरजेचं आहे. यासाठीचा एक प्रकार म्हणजे योगासनं. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांतीसाठी योगासनं हा सर्वोत्तम पर्याय आहे. शरीराची लवचिकता, मानसिक शांती, रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसन व्यवस्था सुधारण्यासाठी देखील योगासनं उपयुक्त आहेत. योगाभ्यास केल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, फुफ्फुसांवर आणि श्वसनमार्गावर सकारात्मक परिणाम होतो आणि ताण देखील कमी होतो.
advertisement
हेच महत्त्व ओळखून आयुष मंत्रालयानं दररोज तीस मिनिटं योगासनं आणि प्राणायाम करण्याचं आवाहन केलं आहे. खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी काही आसनं करुन पाहता येतील.
उत्तानासन - उत्तनासन केल्यानं खोकला आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे शरीरात रक्तप्रवाह वाढतो आणि श्वसनमार्गांना आराम मिळतो. वायुमार्ग उघडे असतात तेव्हा नाक बंद होणं आणि घशातील घट्टपणा कमी होतो. या आसनामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे सर्दी आणि फ्लू मुळे होणारा त्रास कमी होतो. उत्तानासनामुळे मानसिक ताणही कमी होतो आणि ताण कमी झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती आणखी वाढते.
advertisement
सेतुबंधासन - सेतुबंधासनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि नाकातील रक्तसंचय कमी होतो. सेतुबंधासनामुळे डोकं आणि छातीत रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे घसा आणि फुफ्फुस ताजेतवाने होतात.
अधोमुख श्वानासन - खोकला आणि सर्दी यासाठीही अधोमुख श्वानासन फायदेशीर मानलं जातं. या आसनामुळे शरीराचा वरचा भाग ताणला जातो आणि फुफ्फुसांचं कार्य सुधारतं. फुफ्फुसं योग्यरित्या कार्य करतात तेव्हा श्वास घेणं सोपं होतं आणि घशातील रक्तसंचय कमी होतो. शिवाय, या आसनामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे संसर्गाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. आयुष मंत्रालयाच्या मते, हे आसन नियमितपणे केल्यानं हिवाळ्यात खोकला आणि सर्दी होण्याची लक्षणं कमी होतात आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Congestion : प्रकृती स्वास्थ्यासाठी द्या तीस मिनिटं, श्वासाच्या समस्या होतील दूर, जाणून घ्या योगासनांचं महत्त्व
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement