advertisement

Food Storing Mistakes : 'ही' फळं आणि भाज्या एकत्र ठेवण्याची चूक करू नका! लवकर होऊ शकतात खराब..

Last Updated:
Do not keep these fruits and vegetables together : फळं आणि भाजीपाला खाणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. फळांमध्ये शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. परंतु ते योग्य प्रकारे आणि योग्य स्थितीत खाल्ले तरच त्यांचा जास्त फायदा होतो. त्यामुळे अनेकजण बाजारातून आठवड्याभराचा भाजीपाला आणि फळं एकत्रच घेऊन येतात आणि ते साठवून ठेवतात. परंतु हे अनेकदा ते खराब होतात.
1/9
डॉक्टर्स फ्रेश फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. फ्रेश फळं किंवा भाज्या खाल्ल्याने त्यातील सर्व घटक शरीराला मिळातात. परंतु अनेकांना दररोज मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाज्या विकत आणणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण आठवडी बाजारातून एकदाच आठवड्याभर पुरतील एवढ्या फळे आणि भाज्या खरेदी करतात आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवतात.

2/9
परंतु असे केल्याने काही दिवसांतच फळं आणि भाज्या खराब होऊ लागतात. तुमच्यासोबत देखील असं घडत असेल तर त्यामागचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे. हे कायम लक्षात ठेवा की, काही फळं आणि भाज्या एकत्र साठवल्यास लवकर खराब होऊ शकतात. अनेक जण नकळत हीच चूक करतात आणि त्यामुळे फळं आणि भाज्या कोमेजून जातात आणि त्यांच्यातील ताजेपणा कमी होतो.

3/9
काही रिपोर्ट्सनुसार काही फळं आणि भाज्या इथिलीन गॅस नावाचा वायू सोडतात. हा वायू पिकण्याच्या प्रक्रियेला गती देतो. काही फळं या वायूला अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे ते एकत्र साठवल्याने लवकर खराब होऊ शकतात. तसेच वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांचा ओलावा आणि पिकण्याचा दर वेगवेगळा असतो. त्यामुळे ते खराब होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. कोणते फळं आणि भाज्या एकत्र साठवू नये ते जाणून घेऊया.

4/9
अनेक जण कांदे आणि बटाटे एकाच टोपलीत साठवतात. परंतु ते अतिशय चुकीची आहे. कारण कांद्यातून निघणाऱ्या वायूमुळे बटाटे लवकर खराब होऊ शकतात, तसेच बटाट्यातील ओलावा कांद्यांना लवकर खराब करू शकतो. त्यामुळे ते दोन्ही थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी वेगळे साठवा.

5/9
टोमॅटो आणि काकडी एकत्र साठवू नका. कारण टोमॅटो इथिलीन वायू सोडतात आणि त्यामुळे काकडी लवकर खराब होऊ शकते. टोमॅटो कायम रुम टेम्परेचरवर साठवा, ते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते, तर काकडी कायम रेफ्रिजरेटरमध्ये सुरक्षित ठेवल्यास तिचा ताजेपणा अधिक काळ टिकून राहतो.

6/9
सफरचंद आणि गाजर हे दोन्ही कधीच एकत्र साठवू नका. कारण सफरचंदातून निघणाऱ्या वायूमुळे गाजर लवकर खराब होतात. त्यांची चव देखील बदलू शकते. हे दोन्ही तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये साठवू शखता. परंतु ते वेगवेगळ्या कंटेनर ठेवा. त्यामुळे दोन्ही अधिक काळ फ्रेश राहतील.

7/9
केळी आणि पीच एकत्र साठवण्यास ते लवकर पिकू शकतात, तसेच खराबही होऊ शकतात. कारण केळी जास्त प्रमाणात इथिलीन वायू सोडतात. स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी देखील वेगळे साठवणे आवश्यक असते. कारण स्ट्रॉबेरी प्रभावाने ब्लूबेरी खराब होऊ शकतात आणि त्या लवकर मऊ होऊ शकतात.

8/9
फळं आणि भाज्या जास्त काळ ताज्या ठेवणं हे काही खूप अवघड काम नाही. फक्त कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावे आणि कोणते बाहेर हे समजून घ्या. तसेच फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या साठवताना कायम वेगवेगळ्या कंटेनरमध्ये किंवा ड्रॉव्हरमध्ये साठवा. यामुळे ते अधिक काळ फ्रेश राहण्यास मदत होईल.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement