Eye Care : डोळे चोळण्याची छोटी सवय ठरू शकते धोकादायक, वाचा कारणं आणि परिणाम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डोळे चोळणं ही एक धोकादायक सवय आहे. यामुळे हळूहळू दृष्टी कमकुवत होऊ शकते. डोळे म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात मौल्यवान आणि नाजूक अवयव आहे. डोळे चोळण्यासारखी छोटीशी सवय देखील खूप नुकसान करू शकते. पुढच्या वेळी जेव्हा डोळ्यात जळजळ होईल किंवा खाज येईल तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
मुंबई : आता झालेल्या दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा त्रास अनेकांना होतो. काहींना श्वसनात अडथळा येतो. काहींना डोळ्यात जळजळ जाणवते.
आता दिवाळी म्हणून नाही एरवीही धुराच्या किंवा इतर कारणांमुळे डोळे चोळत असाल तर थांबा. कारण, ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. बरेच जण डोळ्यांची जळजळ आणि खाज सुटणं हे थकवा, झोपेचा अभाव किंवा ऍलर्जी समजतात आणि डोळे चोळत राहतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर, नेत्रतज्ज्ञ काय म्हणतात ते समजून घेऊया.
advertisement
कारण, डोळे चोळणं ही एक धोकादायक सवय आहे. यामुळे हळूहळू दृष्टी कमकुवत होऊ शकते. डोळे म्हणजे आपल्या शरीरातील सर्वात मौल्यवान आणि नाजूक अवयव आहे. डोळे चोळण्यासारखी छोटीशी सवय देखील खूप नुकसान करू शकते. पुढच्या वेळी जेव्हा डोळ्यात जळजळ होईल किंवा खाज येईल तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
advertisement
नेत्रतज्ज्ञांच्या मते, वारंवार डोळे चोळल्यानं केवळ त्यांच्या नाजूक पडद्यांवर परिणाम होत नाही तर संसर्ग, जळजळ आणि कायमची दृष्टी कमी होण्याचा धोका देखील वाढतो. बऱ्याच प्रकरणांत, यामुळे केराटोकोनस नावाचा आजार देखील होऊ शकतो, ज्यामध्ये कॉर्निया पातळ होतो आणि बाहेरून फुगतो आणि व्यक्तीला अस्पष्ट दिसतं.
वारंवार डोळे चोळल्यानं कोणतं नुकसान होऊ शकतं आणि ही सवय टाळण्यासाठी काय करावं समजून घेऊया.
advertisement
दृष्टी कमकुवत होणं - आपल्या डोळ्यांचा कॉर्निया अत्यंत संवेदनशील आणि नाजूक असतो. वारंवार डोळे चोळल्याने सूक्ष्म ओरखडे येतात. कालांतराने, कॉर्निया पातळ होऊ लागतो आणि दृष्टी अंधुक होते.
संसर्गाचा धोका - वारंवार डोळे चोळल्यानं धूळ, बॅक्टेरिया आणि विषाणू थेट डोळ्यांत जाऊ शकतात. यामुळे संसर्ग किंवा लालसरपणा येऊ शकतो. डोळ्यांना खाज येत असतील तर डोळे चोळण्याऐवजी स्वच्छ पाण्यानं धुवा.
advertisement
डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येणं आणि सूज येणं - वारंवार डोळे चोळल्यानं डोळ्यांभोवतीच्या त्वचेतील रक्तवाहिन्या फुटू शकतात, ज्यामुळे काळी वर्तुळं आणि सूज येऊ शकते.
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी -
नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानं Eye drops वापरा.
डोळे थंड पाण्यानं धुवा.
advertisement
अॅलर्जी किंवा धूळ टाळण्यासाठी बाहेर पडताना गॉगल वापरा.
स्क्रीन टाइम कमी करा आणि दर वीस मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 10:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eye Care : डोळे चोळण्याची छोटी सवय ठरू शकते धोकादायक, वाचा कारणं आणि परिणाम


