advertisement

Nashik Crime: वाढदिवशीच आश्रमशाळेतून निघून गेला, दोन दिवसांनंतर समोर आला धक्कादायक प्रकार; नाशिक हादरलं

Last Updated:

त्र्यंबकेश्वरमधील पिंप्री गावातील एक शालेय विद्यार्थी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. पण आता अखेर त्याचा शोध लागला असून तो मृतावस्थेत आढळून आला आहे.

News18
News18
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री गावातील दोन दिवसांपासून एक विद्यार्थी बेपत्ता असल्याची चर्चा होती. पण त्यानंतर तो दोन दिवसांनंतर एका झाडा झुडपात मृतावस्थेत आढळून आला. त्याने जंगलामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या दिवशी हा शालेय विद्यार्थी आश्रमशाळेतून गायब झाला त्या दिवशी नेमका त्याचा वाढदिवस होता. शालेय विद्यार्थ्याने आयुष्य संपवण्याचा एवढा मोठा निर्णय का घेतला? याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्या त्र्यंबकेश्वर पोलि‍सांकडून घटनेची सखोल चौकशी केली जात असून त्याच्या आत्महत्येचं गुढ सध्या पोलीस शोधत आहेत.
गुरूवारी (12 मार्च 2026) संजय सदू नडगे (17) या शालेय विद्यार्थ्याने कोणाला न सांगता अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पिंप्रीतील माध्यमिक आश्रमशाळेमध्ये तो बेपत्ता झालेला विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये सध्या शिकत आहे. संजयचा 12 मार्चच्या दिवशी वाढदिवस असतो. वाढदिवशीच तो अचानक कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला. 15 मार्चच्या दिवशी त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पिंप्री पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे दोन भावंडही याच आश्रमशाळेमध्ये शिकतात.
advertisement
संजय त्याच्या वाढदिवशी दुपारच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला. तो पुन्हा परत न आल्यामुळे शाळा प्रशासनाच्या मनात शंका आली. त्यांनी लगेचच त्याचा शोधही घेतला, पण संजय न सापडल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात शुक्रवारी (13 मार्च) संजय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रे फिरवत त्याचा शोध घेतला. आश्रमशाळेपासून दोन किमी दूर असलेल्या एका जंगलात जिथे अनेक शेतकरी आपली गुरं चारण्यासाठी घेऊन येत असतात. त्या ठिकाणी त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक अशोक बोडके आणि त्यांच्या इतरत्र सहकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली. घटनास्थळी धाव घेत त्यांनी लगेचच संजयचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तो पर्यंत संजयच्या आई- वडीलांनाही घटनेची माहिती कळवण्यात आली होती. घटनेचा पंचनामा केल्यानंतर संजयचे आई- वडील सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. संजयच्या आत्महत्येचं गुढ नेमकं त्र्यंबकेश्वर पोलीस केव्हापर्यंत शोधून काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय नडगे याच्यासोबत त्याचे दोन भाऊ सुद्धा ते देखील पिंप्री आश्रमशाळेतच शिकत आहेत.
advertisement
दरम्यान, संजय बेपत्ता झाल्यापासून त्याच्या आई- वडिलांनीही त्याचा शोध घेतला होता. पण त्यांनाही त्याचा शोध लागला नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरातच्या सीमेजवळ बुरूडपाडा गावाचा तो रहिवासी होता. त्याचे आई- वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. रोजंदारीमुळे स्थलांतर करावे लागत असल्यामुळे संजयला शिक्षणासाठी आश्रमशाळेत ठेवले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: वाढदिवशीच आश्रमशाळेतून निघून गेला, दोन दिवसांनंतर समोर आला धक्कादायक प्रकार; नाशिक हादरलं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement