Weather Update: अफगाणिस्तानमध्ये असं काय घडतंय? ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतोय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मार्च महिन्यात अचानक पावसाचे आगमन, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रात १८-२० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, मुंबईत पाऊस. तापमानात घट, एप्रिलच्या मध्यापर्यंत उष्णतेपासून दिलासा.
advertisement
मार्च महिन्यात अचानक पाऊस कुठून आणि कसा आला? इतक्या उष्णतेनंतर पाऊस का पडतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेऊया. विशेष म्हणजे, १८ मार्चपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, यामुळे उष्णतेची लाट एप्रिलच्या मध्यापर्यंत लांबणीवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.- फोटो सौजन्य - AI
advertisement
वेस्टर्न डिस्टर्बन्स अफगाणिस्तानकडून भारताच्या दिशेनं पुढे सरकला आहे. त्याचा परिणाम म्हणून हवामानात अचानक बदल झाले आहेत. त्यामुळे उत्तर भारतापासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. पश्चिम बंगालपासून खाली दक्षिणेपर्यंत पुन्हा पावसाचा अंदाज आहे. 18 तारखेपासून पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. विदर्भ मराठवाडा इथे पाऊस होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
हरियाणाच्या बाजूला सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाला असून तो दक्षिणेकडे सरकत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे. 18 ते 20 मार्च रोजी महाराष्ट्रात कोकण पट्टा वगळता सगळीकडे कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील, मात्र बाकी ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement









