Kidney Health : मूत्रपिंडांची हानी रोखा, आतापासूनच बदला या सवयी, वाचा सविस्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या मूत्रपिंडांना हळूहळू नुकसान पोहोचवू शकतात आणि आपल्याला ते कळतही नाही. म्हणून, या सवयी वेळेत सुधारणं खूप महत्वाचं आहे. रोजच्या कोणत्या सवयींमुळे किडनीचे नुकसान होतं आणि ते जपणं का महत्त्वाचं आहे समजून घेऊयात.
मुंबई : मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरासाठी गाळणी असते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडांचं काम महत्त्वाचं आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवणं तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे. पण, कधीकधी नकळतपणे आपल्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवतो.
आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या मूत्रपिंडांना हळूहळू नुकसान पोहोचवू शकतात आणि आपल्याला ते कळतही नाही. म्हणून, या सवयी वेळेत सुधारणं खूप महत्वाचं आहे. रोजच्या कोणत्या सवयींमुळे किडनीचे नुकसान होतं आणि ते जपणं का महत्त्वाचं आहे समजून घेऊयात.
advertisement
अतिरिक्त मीठामुळे रक्तदाब वाढतो - मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पण जास्त मीठ खाल्ल्यानं मूत्रपिंडांवर मोठा ताण पडतो. जास्त मीठामुळे शरीरात पाणी टिकवून ठेवलं जातं. यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. मूत्रपिंडातील लहान केशिका हा दाब सहन करू शकत नाहीत आणि हळूहळू खराब होतात.
advertisement
मूत्रपिंडांवर थेट दबाव - मूत्रपिंडांचं प्राथमिक कार्य म्हणजे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचं संतुलन राखणं. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ वापरता तेव्हा मूत्रपिंडांना हे अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. सतत जास्त काम केल्यानं मूत्रपिंडांची गाळण्याची क्षमता कमी होते.
advertisement
किडनी स्टोनचा धोका - जास्त मीठ खाल्ल्यानं मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण वाढतं. हे अतिरिक्त कॅल्शियम मूत्रपिंडात जमा होऊ शकतं आणि यामुळे दगड तयार होऊ शकतात. जे अत्यंत वेदनादायक असतात आणि मूत्रपिंडाच्या कार्यात व्यत्यय आणतात.
प्रोटीनुरिया - खराब झालेल्या मूत्रपिंडांमधून मूत्रात प्रथिनं गळतात, या स्थितीला प्रोटीनुरिया म्हणतात. हे मूत्रपिंडाच्या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे.
advertisement
या सगळ्यातली महत्त्वाची बाब म्हणजे, बहुतेक लोक या सवयीकडे लक्षही देत नाहीत. खरं तर, मीठ आपल्या शरीरात फक्त अन्नात मीठ घालण्याव्यतिरिक्त अनेक मार्गांनी प्रवेश करत असतं. उदाहरणार्थ, प्रक्रिया केलेलं अन्न, पॅकेज केलेले पदार्थ, चिप्स, लोणचं, सॉस, ब्रेड या सगळ्यात मीठ लपलेलं असतं, यामुळे आपल्या शरीरात हे दिसत नसलेलं अन्न प्रवेश करतं आणि यामुळे मूत्रपिंडांना हानी पोहोचते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidney Health : मूत्रपिंडांची हानी रोखा, आतापासूनच बदला या सवयी, वाचा सविस्तर


