Iran Israel War : युद्धामुळे बाजारात उलथापालथ! सोनं-चांदीचे भाव कोसळले, पण 'या' धातूने दिले बंपर रिटर्न
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver Investment: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू करून १७ दिवस झाले. या युद्धाचे परिणाम राजकीय-भौगोलिक होत असून बाजारपेठेवरही होत आहेत.
नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू करून १७ दिवस झाले. या युद्धाचे परिणाम राजकीय-भौगोलिक होत असून बाजारपेठेवरही होत आहेत. या युद्धानं जागतिक कमोडिटी बाजारही हादरवून टाकला आहे. गेल्या १७ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असतानाच, धातू बाजारात अत्यंत अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. तर, दुसरीकडे कोणाच्या ध्यानीमनी नसताना एका धातूने मात्र गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे.
सोने-चांदीचे झळाळी उतरली
नेहमी जागतिक तणावाच्या काळात सोन्याचे दर वाढतात, पण या युद्धात उलटे चित्र दिसत आहे. २७ फेब्रुवारीला १,६२,१०४ रुपयांवर असलेले सोने आता ३.४० टक्क्यांनी घसरून १,५६,५९६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.
चांदीची अवस्था तर अधिकच बिकट आहे. १७ दिवसांपूर्वी २,८२,६४४ रुपयांवर असलेली चांदी आता २,५४,००० रुपयांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच चांदीच्या दरात तब्बल १० टक्क्यांची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
advertisement
गुंतवणूकदारांना कोणी दिला बंपर रिटर्न?
सोनं-चांदीचा दर घसरत असताना दुसरीकडे अॅल्युमिनियमच्या दरात वाढ झाली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजेच २७ फेब्रुवारीला अॅल्युमिनियम ३१३ रुपये प्रति किलो होते. मात्र, आज सोमवारी एमसीएक्सवर (MCX) अॅल्युमिनियम ३४७.५० रुपयांवर पोहोचले आहे. अवघ्या १७ दिवसांत या धातूच्या किमतीत ११ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणमधील तणावामुळे कतार आणि बहरीनसारख्या प्रमुख उत्पादक देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाल्याचा हा परिणाम आहे. जागतिक पुरवठ्यात आखाती देशांचा ८ टक्के वाटा असल्याने अॅल्युमिनियमचा तुटवडा जाणवू लागला आहे.
advertisement
अॅल्युमिनियमच्या दरवाढीचं कारण काय?
युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कतार एनर्जीने अॅल्युमिनियम आणि रसायनांची विक्री तात्पुरती थांबवली आहे. पुरवठा साखळी तुटल्यामुळे अॅल्युमिनियम महागले आहे, तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे आणि डॉलरच्या प्रतिकूल परिणामामुळे सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 12:52 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Iran Israel War : युद्धामुळे बाजारात उलथापालथ! सोनं-चांदीचे भाव कोसळले, पण 'या' धातूने दिले बंपर रिटर्न









