Drinking Water : प्रत्येक व्यक्तीला किती पाणी पिण्याची गरज असते ? प्रत्येक व्यक्तीनुसार हे प्रमाण बदलतं का ?

Last Updated:

आपण पाणी पितो तेव्हा ते केवळ तहान भागवत नाही तर शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी पोहोचत असतं आणि अनेक महत्त्वाची कार्य यामुळे शक्य होतात. पाण्यामुळे आपलं रक्त पातळ ठेवणं शक्य होतं, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकायला मदत होते, पचन सुलभ होतं, त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळते आणि मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई : पाणी आहे म्हणून आपण आहोत. कितीही सुविधा असल्या, भरपूर अन्नपदार्थ असले तरी पाणी नसेल तर जगणं मुश्किल. आपण कितीही चांगलं खातो किंवा कितीही निरोगी असलो तरी, निर्जलीकरणामुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं. आपल्या शरीराचा जवळजवळ दोन तृतीयांश भाग पाण्यानं बनलेला आहे.
डिहायड्रेशन म्हणजेच कमी पाणी पिणं. आपल्या अस्तित्वासाठी पाणी ही मूलभूत गरज आहे. शरीर डिहायड्रेट झालं तर थकवा, डोकेदुखी, तोंड कोरडं होणं, चक्कर येणं आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या वाढतात.
आपण पाणी पितो तेव्हा ते तहान भागवत नाही तर शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी पोहोचत असतं आणि अनेक महत्त्वाची कार्य यामुळे शक्य होतात. पाण्यामुळे आपलं रक्त पातळ ठेवणं शक्य होतं, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकायला मदत होते, पचन सुलभ होतं, त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळते आणि मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.
advertisement
प्रत्येकाला सारख्याच प्रमाणात पाण्याची गरज नसते. एखाद्या व्यक्तीचं वय, वजन, व्यवसाय, हवामान आणि आहार यासारखे घटक त्याला किती पाण्याची आवश्यकता आहे हे ठरवतात.
साधारणपणे, डॉक्टरांच्या मते, एका निरोगी प्रौढ व्यक्तीनं दिवसातून सुमारे दोन ते तीन लीटर पाणी किंवा आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं. काही लोक 8x8 नियमाचं पालन करतात, म्हणजे दिवसातून आठ वेळा आठ औंस पाणी पिणं.
advertisement
काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रति वीस किलो सुमारे एक लीटर पाणी पुरेसं आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याचं वजन साठ किलो असेल तर त्यानं दररोज सुमारे तीन लीटर पाणी प्यावं.
हार्वर्ड हेल्थच्या मते, निरोगी व्यक्तींसाठी, पुरुषांसाठी सरासरी दररोज पाणी सेवन सुमारे 15.5 कप आणि महिलांसाठी सुमारे 11.5 कप आहे. फक्त पाण्याचं प्रमाण महत्त्वाचं नाही तर ते पिण्याची योग्य वेळ महत्त्वाची आहे.
advertisement
यासाठी, उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या; यामुळे शरीर जागं होतं आणि पोट स्वच्छ करणं शक्य होतं. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यानं पचनसंस्था तयार होते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळा, कारण यामुळे पचनक्रिया मंदावते.
जेवणानंतर 45 मिनिटांनी पाणी पिणं चांगलं. व्यायामापूर्वी आणि नंतर पाणी पिणं आवश्यक आहे कारण यामुळे घामामुळे वाया गेलेल्या द्रवपदार्थांची भरपाई करता येते. झोपण्यापूर्वी थोडंसं पाणी प्यायल्यानं शरीरातील पेशी सक्रिय राहतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Drinking Water : प्रत्येक व्यक्तीला किती पाणी पिण्याची गरज असते ? प्रत्येक व्यक्तीनुसार हे प्रमाण बदलतं का ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement