अचानक दरवाजा वाजला अन् उडाली गावाची झोप; पुण्याच्या या परिसरात मध्यरात्रीच 3 धक्कादायक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे धक्कादायक दृश्य कैद झाले असून, चोरटे शस्त्रांसह घराबाहेर वावरताना दिसत आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आदिवासी पट्ट्यात मध्यरात्री चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोखरी येथील भागीतवाडीमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण घरफोडीच्या घटनांनी संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांची झोप उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री चोरट्यांच्या एका टोळीने पोखरी परिसरातील तीन घरांना लक्ष केले. चोरट्यांनी सुरुवातीला घरांचे दरवाजे उचकटून आत शिरण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे धक्कादायक दृश्य कैद झाले असून, चोरटे शस्त्रांसह घराबाहेर वावरताना दिसत आहेत. यापैकी एका घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या महिलांच्या अंगावरील दागिने बळजबरीने ओरबाडून नेले.
advertisement
आलिशान व्हिला, एका हॉलमध्ये बसलेले 3 तालुक्यातले 40 लोक; ते कांड पाहून पोलीसही चक्रावले, मुळशीत खळबळ
तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून या घटना वाढल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. विशेषतः आदिवासी आणि डोंगराळ भागात चोरट्यांनी थेट घरात शिरून महिलांना लुटल्यामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर पवार आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिवसभर परिसरात पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात असून, गुन्हेगारांना लवकरच जेरबंद केले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 12:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
अचानक दरवाजा वाजला अन् उडाली गावाची झोप; पुण्याच्या या परिसरात मध्यरात्रीच 3 धक्कादायक घटना






