TRENDING:

Heart Disease : कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे काय ? हृदयासाठी ही व्याधी का ठरते घातक ?

Last Updated:

हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात तेव्हा हृदयात अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. यामुळे, हृदयाकडे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडणं यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीराच्या आत गडबड असते तेव्हा शरीर त्याचे संकेत देत असतं. या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं तर शरीराला होणारी हानी रोखण्याची शक्यता वाढते.
News18
News18
advertisement

जाणून घेऊया कोरोनरी हार्ट डिसीजबद्दल. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात तेव्हा हृदयात अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. यामुळे, हृदयाकडे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडणं यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन आणि रक्त पोहोचावं यासाठी हृदय अहोरात्र काम करत असतं. यातलं महत्त्वाचं काम म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा..या रक्तवाहिन्यांमधे रक्तपुरवठा रोखला जाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. वैद्यकीय भाषेत याला कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट ब्लॉकेज म्हणतात. पण, ही स्थिती अचानक उद्भवत नाही, त्याआधी शरीर अनेक संकते देत असतं.

advertisement

Skin Care : कोरियन स्किनकेअर रुटिन का आहे चर्चेत ? 4-2-4 रुल का आहे खास ?

छातीत दुखणं - हार्ट ब्लॉकेजचं सर्वात सामान्य लक्षण आहे. छातीत दाब, जळजळ किंवा जडपणा जाणवत असेल तर ते angina चं लक्षण असू शकतं. अनेकदा हा प्रकार तणावामुळे किंवा शारीरिक थकव्यामुळे होतो. अनेकदा विश्रांती घेतल्यानं हे प्रमाण कमी होतं.

advertisement

श्वास घेण्यास त्रास होणं - थोडं चालल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयाला पुरेसं रक्त मिळत नसल्याचं लक्षण आहे. आर्टरी ब्लॉकेजचं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. असं झालं तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणं महत्वाचं आहे.

काहीही केल्यानंतर थकवा जाणवणे - दैनंदिन कामं करूनही थकवा जाणवत असेल तर हृदय शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवू शकत नसल्याचं हे लक्षण आहे. आर्टरी ब्लॉकेजचं हे प्रमुख लक्षण असू शकतं.

advertisement

हृदयाच्या समस्या छातीत नसून शरीराच्या इतर भागात जाणवतात. डाव्या हातामधे, पाठीत किंवा जबड्यात वेदना होतात. अनेकदा या वेदनांना स्नायू दुखणं म्हणून दुर्लक्ष करतात, पण आर्टरी ब्लॉकेजचं हे प्रमुख लक्षण असू शकतं.

Spot Jogging : स्पॉट जॉगिंग करणं का महत्त्वाचं ? घरी करता येईल असा सोपा व्यायाम

हृदयाचे अनियमित ठोके - हृदयाचे ठोके अचानक वाढले किंवा त्यात चढ-उतार झाले, किंवा चक्कर येत असेल किंवा डोकं हलकं होत असेल, तर ही ब्लॉकेजची लक्षणं असू शकतात.

advertisement

ब्लॉकेज होण्याची कारणं -

कोलेस्टेरॉल पातळी वाढणं

उच्च रक्तदाब

धूम्रपान

मधुमेह

दीर्घकाळ बसून काम करणं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जीवावर बेतू शकतं, ‘हँगओव्हर’ झालंय? लगेच करा हे उपाय, V
सर्व पहा

हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास म्हणजेच फॅमिली हिस्ट्री असेल तेव्हाही हा धोका अधिक असतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Disease : कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे काय ? हृदयासाठी ही व्याधी का ठरते घातक ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल