Spot Jogging : दिवसातली फक्त पंधरा मिनिटं करा हा व्यायाम, शरीर फिट ठेवण्यासाठी थोडा वेळ नक्की ठेवा

Last Updated:

सध्या थंडीच्या दिवसात घरीही करता येतील असेही अनेक व्यायाम आहेत. स्पॉट जॉगिंग हा व्यायाम तुम्ही घरीही करु शकता. पंधरा मिनिटं स्पॉट जॉगिंग करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

News18
News18
मुंबई : दिवसातली दहा - पंधरा मिनिटं स्वत:साठी देणं खूप महत्त्वाचं आहे. प्रकृतीच्या तंदुरुस्तीसाठी पंधरा - वीस मिनिटांत करता येतील असे अनेक व्यायाम आहेत. सध्या थंडीच्या दिवसात घरीही करता येतील असेही अनेक व्यायाम आहेत.
स्पॉट जॉगिंग हा व्यायाम तुम्ही घरीही करु शकता. पंधरा मिनिटं स्पॉट जॉगिंग करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
स्पॉट जॉगिंग - स्पॉट जॉगिंग हा हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी उत्कृष्ट व्यायाम आहे. यामुळे हृदयाची गती वाढते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचे स्नायू मजबूत होतात. दररोज पंधरा मिनिटं स्पॉट जॉगिंग केल्यानं उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.
advertisement
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला व्यायाम आहे. पंधरा मिनिटं स्पॉट जॉगिंग केल्यानं अंदाजे शंभर-दिडशे कॅलरीज बर्न होतात. यामुळे शरीरातील चयापचय वाढतो आणि अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. नियमित व्यायामानं वजन कमी करण्यास खूप मदत होऊ शकते.
advertisement
पायांची बळकटी - हा व्यायाम मांड्या, पोटऱ्या आणि कंबरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त ठरतो. नियमित व्यायामामुळे पाय मजबूत होतात.
स्टॅमिना - सुरुवातीचे काही दिवस ही पंधरा मिनिटं थकवणारी वाटू शकतात, पण काही दिवसांतच स्टॅमिना वाढायला सुरुवात होईल. यामुळे शरीराची ऑक्सिजन वापरण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे दिवसभर अधिक ऊर्जावान आणि सक्रिय वाटतं. या व्यायामामुळे थकवा आणि आळस दूर होण्यासाठी मदत होत.
advertisement
ताण व्यवस्थापन - स्पॉट जॉगिंगमुळे मेंदूतील एंडोर्फिनचं प्रमाण वाढतं. यामुळे ताण, चिंता आणि नैराश्याच्या भावना कमी होण्यास मदत होते. सकाळी पंधरा मिनिटं जॉगिंग केल्यानं दिवसभर मूड चांगला राहू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Spot Jogging : दिवसातली फक्त पंधरा मिनिटं करा हा व्यायाम, शरीर फिट ठेवण्यासाठी थोडा वेळ नक्की ठेवा
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement