फिल्मसिटीत अवतरलं १८ व्या शतकातलं पुणे, 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा भव्य सेट पाहिलात का? VIDEO

Last Updated:

Grand Set of Mi Savitribai Jyotirao Phule Serial: नुकताच या मालिकेच्या भव्यदिव्य सेटचं अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला आणि यावेळी इतिहासाच्या त्या हुबेहुब पाऊलखुणा पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत.

News18
News18
मुंबई: त्यांच्या वाटेवर सनातनी विचारांचे काटे होते, पण डोळ्यांसमोर स्त्री-शिक्षणाचं लख्ख स्वप्न होतं. अंगावर शेणाचे गोळे झेलले, पण ज्ञानाची पाटी कधी खाली ठेवली नाही. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांच्या संघर्षाचा काळ आता पुन्हा जिवंत होणार आहे. स्टार प्रवाहची नवी ऐतिहासिक महागाथा ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा इतिहासात डोकावून पाहण्याची संधी मिळणार आहे. नुकताच या मालिकेच्या भव्यदिव्य सेटचं अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला आणि यावेळी इतिहासाच्या त्या हुबेहुब पाऊलखुणा पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत.

इतिहासात घेऊन जाणारा भव्य सेट

गोरेगावच्या चित्रनगरीत उभ्या राहिलेल्या या सेटच्या फित कापून जेव्हा दारं उघडली, तेव्हा साध्या लाकडी चौकटी आणि मातीच्या भिंतींनी दीडशे वर्षांपूर्वीचा काळ उभा केला. हा केवळ एक सेट नाही, तर त्या काळच्या सामाजिक वास्तवाचं जिवंत रूप आहे. कलादिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा वाडा साकारला आहे. सावित्रीबाईंनी ज्या घरातून क्रांतीचं पहिलं पाऊल टाकलं, त्या भिंतींमधील प्रत्येक बारकावा इथे जपण्यात आला आहे.
advertisement
advertisement

सावित्रीबाईंच्या भुमिकेत मधुराणी गोखले

‘आई कुठे काय करते’ मधून घराघरात पोहोचलेली लाडकी मधुराणी गोखले आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या प्रसंगी ती खूपच भावूक झाली होती. ती म्हणाली, "आज आपण जे मोकळेपणाने श्वास घेतोय, शिकतोय, ते केवळ सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फळ आहे. ही भूमिका साकरणं म्हणजे केवळ अभिनय नाही, तर त्या महान माऊलीला वाहिलेली एक कृतज्ञता आहे. मनात थोडी धाकधूक आहे, पण महाराष्ट्राच्या लेकीची ही गाथा घराघरात पोहोचवण्यासाठी मी सज्ज आहे."
advertisement












View this post on Instagram























A post shared by Star Pravah (@star_pravah)



advertisement

१७ वर्षांनंतर डॉ. अमोल कोल्हेंचं स्टार प्रवाहवर कमबॅक

महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी हा सोहळा दुहेरी आनंदाचा होता. १७ वर्षांपूर्वी ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका त्यांनी स्टार प्रवाहसोबत केली होती, ज्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. आज ते याच वाहिनीवर केवळ अभिनेता म्हणून नाही, तर निर्माता म्हणूनही परतले आहेत. कोल्हे म्हणाले, "जोतीराव म्हणजे व्यवस्थेला प्रश्न विचारणारी धगधगती मशाल. त्यांच्या विचारांचा वारसा मांडणं ही मोठी जबाबदारी आहे. आज घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची खरी प्रेरणा सावित्रीबाईच आहेत."
advertisement

'मैलाचा दगड' ठरणारी मालिका - सतीश राजवाडे













View this post on Instagram























A post shared by Star Pravah (@star_pravah)



advertisement
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी यावेळी आपला विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, ही मालिका केवळ मनोरंजन नसून समाजाला विचार करायला लावणारा एक आरसा आहे. सावित्रीबाईंचा तो त्याग आणि धैर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
फिल्मसिटीत अवतरलं १८ व्या शतकातलं पुणे, 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा भव्य सेट पाहिलात का? VIDEO
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement