काकडी चुकूनही कडू आल्यास ती कुणालाही खावीशी वाटत नाही. म्हणून काकडी खरेदी करताना काही सोप्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. बाजारातून फ्रेश काकडी आणण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.
अशी निवडा फ्रेश आणि रसाळ काकडी..
- सर्वात आधी काकडीचा आकार आणि पोताकडे लक्ष द्या. जास्त जाड किंवा विचित्र आकाराच्या काकड्या आतून कडू असू शकतात शिवाय काकडी वाकडी किंवा खूप मोठी दिसत असेल, तर आहि काकडी घेऊ नका. मध्यम आकाराची आणि सरळ निवडा. अशी काकडी चवीला चांगली असते आणि शक्यतो कडू निघताच नाही.
advertisement
- काकडीचं वजन तापासूनही तुम्ही तिच्या कडुपणाचा अंदाज लावू शकता. काकडी खूप जड वाटत असेल तर ती जास्त पिकलेली किंवा कडू चवीची असू शकते. म्हणूनच हलकी काकडी निवडा. ही सहसा जास्त ताजी आणि चवदार असते.
- काकडीच्या सालीचा रंगही तपासा. गडद हिरवी किंवा फिकट हिरवट-पिवळी काकडी सहसा खाण्यासाठी चांगली असते. मात्र काकडी खूप पिवळी पडली असेल, तर ती जास्त पिकलेली किंवा जुनी असू शकते. म्हणून अशी काकडी घेऊ नका. कारण ती कडू लागू शकते.
- काकडी हलक्या हाताने दाबून पाहा, जेणेकरून तुम्हाला ती ताजी आहे की नाही हे कळेल. दाबल्यावर काकडी खूप मऊ असेल, तर ती सडलेली किंवा खूप जुनी असू शकते. ताजी काकडी नेहमी टणक आणि घट्ट असते.
- काकडीची दोन्ही टोकंही काळजीपूर्वक तपासा. जर टोक खूप कोरडे किंवा कडक वाटत असतील, तर काकडी जुनी असू शकते. ताज्या काकड्यांचे टोक किंचित मऊ आणि फ्रेश असते. कधीकधी काकडीचा कडूपणा टोकांवर जास्त अवलंबून असतो, म्हणून हा भाग तपासलाच पाहिजे.
महत्त्वाच्या टिप्स..
उन्हाळ्यात काकडी खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. मात्र कडू किंवा खराब झालेली काकडी खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. म्हणून काकडी खरेदी करताना या छोट्या छोट्या गोष्टी तपासा. नेहमी मध्यम आकाराच्या, गडद हिरव्या, घट्ट आणि ताज्या काकड्यांना प्राधान्य द्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
