TRENDING:

Dental Hygiene : दिवसातून किती वेळा दात घासावेत ? झोपण्यापूर्वी दात घासणं का महत्त्वाचं ? जाणून घ्या दातांच्या आरोग्याचा आणि हृदयरोगाचा संंबंध

Last Updated:

दातांची स्वच्छता योग्यप्रकारे न होणं, दातांकडे दुर्लक्ष केल्यानं दात किडणं, वास येणं हा त्रास होतोच पण अधिक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. झोपण्यापूर्वी दात घासले नाहीत तर हृदयरोगाचा धोका जास्त असतो. तोंडाची स्वच्छता विशेषतः हृदयासाठी महत्त्वाची आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवसाच्या सुरुवातीला आणि दिवस संपताना म्हणजे रात्री दात घासण्याची सवय ही आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. दात घासणं केवळ मौखिक आरोग्यासाठी नाही तर पूर्ण आरोग्यासाठी चांगली सवय का आहे ते समजून घेऊया.
News18
News18
advertisement

दातांची स्वच्छता योग्यप्रकारे न होणं, दातांकडे दुर्लक्ष केल्यानं दात किडणं, वास येणं हा त्रास होतोच पण अधिक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. झोपण्यापूर्वी दात घासले नाहीत तर हृदयरोगाचा धोका जास्त असतो. तोंडाची स्वच्छता विशेषतः हृदयासाठी महत्त्वाची आहे.

Tooth Ache : दातदुखीचे असतात विविध प्रकार, जाणून घ्या दात दुखण्याची अन्य कारणं

advertisement

रात्री दात न घासल्यानं दातांमधे कीड होण्याचा धोका वाढतो हे आपल्याला ठाऊक असतं पण 2023 च्या एका अभ्यासातून याविषयी महत्त्वाचे निष्कर्ष समोर आलेत. तोंडाची स्वच्छता कमी असणं म्हणजे हदयरोग होण्याची शक्यता वाढवणारा घटक आहे. यासाठी योग्य वेळी ब्रश करणं महत्त्वाचं आहे.

मौखिक आरोग्य आणि हृदयरोगाचा काय संबंध आहे समजून घेऊया. तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात, ज्यामुळे सूज येते आणि कालांतरानं त्याचा तुमच्या हृदयावर परिणाम होतो. ब्रश न केल्यानं थेट हृदयरोग होत नाही, पण मौखिक आरोग्य खराब असणं हे हृदयाला हानी पोहोचवू शकणाऱ्या अनेक घटकांपैकी एक आहे.

advertisement

Hair Care : केस अकाली पांढरे झालेत ? वाचा केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् गाव गाठलं, अर्ध्या एकरात केली शेती, 3 महिन्यात लखपती
सर्व पहा

नियमितपणे ब्रश करणाऱ्यांचं हृदय निरोगी असतं. दिवसातून कमीत कमी तीन वेळा ब्रश करणं आणि नियमितपणे फ्लॉस करणं हृदयरोगाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. दात घासण्याच्या सवयीमुळे हिरड्यांचे आजार आणि दात पडणं यासारख्या दंत समस्यांची शक्यता देखील कमी होते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dental Hygiene : दिवसातून किती वेळा दात घासावेत ? झोपण्यापूर्वी दात घासणं का महत्त्वाचं ? जाणून घ्या दातांच्या आरोग्याचा आणि हृदयरोगाचा संंबंध
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल