advertisement

Tooth Ache : दातदुखी म्हणजे केवळ दातांच्या समस्याच असतील असं नाही, समजून घ्या दात दुखण्याची अन्य कारणं

Last Updated:

दरवेळी, दातदुखी फक्त दातांशीच संबंधित नसते. ती नसा, सायनस किंवा जबड्याची समस्या देखील असू शकते. हा फरक समजून घेतल्यानं तुम्हाला यासाठी योग्य तज्ज्ञ शोधण्यात मदत होऊ शकते.

News18
News18
मुंबई : दात दुखायला लागले की प्रचंड वेदना होतात. दात दुखी सुरु झाली की आपण सर्वात आधी दंतवैद्याकडे जातो आणि बहुतेकदा आढळणारी समस्या म्हणजे दातांमधे लागलेली कीड, संसर्ग किंवा हिरड्यांची समस्या.
दरवेळी, दातदुखी फक्त दातांशीच संबंधित नसते. ती नसा, सायनस किंवा जबड्याची समस्या देखील असू शकते. हा फरक समजून घेतल्यानं तुम्हाला यासाठी योग्य तज्ज्ञ शोधण्यात मदत होऊ शकते.
काहीवेळा दातदुखी सतत होत नाही. वेदना दातामुळे होत असेल, तर तुम्ही काहीतरी गरम किंवा थंड खाता तेव्हा किंवा काहीतरी चावल्यावर ती अधिकच वाढते. यामुळे हिरड्यांना सूज आणि लालसरपणा येतो. दात किडणं किंवा भेगा पडल्यानं देखील दातदुखी होऊ शकते. दंतवैद्याचा सल्ला घेतल्यानंतर या समस्या बऱ्याचदा दूर होतात.
advertisement
दातदुखी खालील कारणांमुळे होऊ शकते:
नसा: ट्रायजेमिनल न्यूराल्जिया ही एक मज्जातंतू समस्या आहे जी कधीकधी दातदुखीचं कारण बनू शकते. यामुळे अचानक, तीव्र वेदना होऊ शकतात.
सायनस आणि नाक: वरच्या दातांची मुळं सायनस पोकळीच्या अगदी जवळ असतात. सायनस संसर्ग किंवा क्रॉनिक सायनुसायटिसमुळे दातदुखी होऊ शकते.
advertisement
जबडा आणि सांधे: TMJ विकारामुळे दातांमध्ये वेदना पसरू शकतात, जबड्याच्या खालच्या भागाला तुमच्या कवटीशी जोडणारा सांधा आहे. यामुळे आपल्याला तोंड हलवता येतं. दात घासणं, जबडा दाबणं किंवा ताण देणं यामुळे TMJ विकारांची वेदना आणखी वाढू शकते.
advertisement
दातदुखीची ही कारणं देखील असू शकतात:
कानाचा संसर्ग
क्लस्टर डोकेदुखी
हृदयाशी संबंधित आजार
हिरड्यांना सूज किंवा दाब जाणवत असेल.
वेदना चेहऱ्याच्या इतर भागात पसरते.
स्पर्श करणं, बोलणं किंवा दात घासणं यासारख्या क्रिया करताना वेदना जाणवतात.
सतत डोकं दुखणं.
वेदना अचानक सुरू होतात.
तीव्रता वाढते.
दातांच्या उपचारानंतरही या वेदना कायम राहिली तर डॉक्टरांना अवश्य भेटा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tooth Ache : दातदुखी म्हणजे केवळ दातांच्या समस्याच असतील असं नाही, समजून घ्या दात दुखण्याची अन्य कारणं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement