advertisement

Hair Care : मेंदी किंवा रंग न लावता करता येतील केस काळे, स्वस्त आणि सोपे उपाय वापरुन पाहा

Last Updated:

केस काळे करण्यासाठी रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर केल्यानं केवळ केसांनाच नाही तर तुमच्या टाळूलाही नुकसान होऊ शकतं. पांढरे केस काळे करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूयात. आवळा आणि शिकाकाई, काळा चहा, नारळ तेल आणि लिंबाचा रस या उपायांनी केस काळे होण्यास मदत होऊ शकते.

News18
News18
मुंबई : वयानुसार केस पांढरे होणं वेगळं पण सध्या केस लवकर पांढरे होण्याची समस्या सध्या वाढते आहे.  तुम्हालाही अकाली केस पांढरे होण्याचा त्रास होत असेल आणि तुम्ही केस काळे करण्यासाठी विविध उत्पादनं वापरत असाल तर इथे सांगितलेले उपाय तुम्हाला उपयोगी ठरु शकतील.
आपल्या केसांचा रंग 'मेलॅनिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे असतो, जो 'मेलॅनोसाइट' पेशींद्वारे तयार होतो. आपल्या शरीरातील या पेशी मेलेनिन तयार करणं थांबवतात तेव्हा आपले केस त्यांचा नैसर्गिक रंग गमावू लागतात आणि अकाली राखाडी होतात.
केस अकाली पांढरे होणं हे पौष्टिक कमतरता आणि अनुवांशिक घटकांमुळे असू शकतं. म्हणून, पहिलं पाऊल म्हणजे तुमच्या आहाराकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
केस काळे करण्यासाठी रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर केल्यानं केवळ केसांनाच नाही तर तुमच्या टाळूलाही नुकसान होऊ शकतं. पांढरे केस काळे करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूयात. आवळा आणि शिकाकाई, काळा चहा, नारळ तेल आणि लिंबाचा रस या उपायांनी केस काळे होण्यास मदत होऊ शकते.
advertisement
- आवळा आणि शिकाकाई - पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा आणि शिकाकाई अत्यंत परिणामकारक मानले जातात. आवळ्यात भरपूर पौष्टिक घटक असतात. आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. थोड्या वेळानं सौम्य शाम्पूनं धुवा. यामुळे केस काळे होण्यास मदत होऊ शकते.
- काळा चहा - प्रत्येक स्वयंपाकघरात चहा सहज उपलब्ध असतो. चहाच्या पानांनी चहा तर मस्तच लागतो पण राखाडी केस काळे करण्यास देखील मदत होते. एक कप पाण्यात काही चमचे ब्लॅक टीची पानं उकळा, ते थंड होऊ द्या आणि या पाण्यानं तुमचे केस धुवा. यामुळे तुमचे केस काळे होतीलच पण ते चमकदारही होतील.
advertisement
- नारळ तेल आणि लिंबाचा रस - नारळ तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. केस पांढरे होणं टाळायचं असतील तर तुम्ही नारळ तेल वापरू शकता. नारळाचं तेल लिंबाच्या रसात मिसळा आणि केसांना मसाज करा. काही तासांनी केस धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : मेंदी किंवा रंग न लावता करता येतील केस काळे, स्वस्त आणि सोपे उपाय वापरुन पाहा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement