Cancer : किरकोळ वाटतात म्हणून लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतात गंभीर आजाराचे संकेत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
प्रोस्टेट कर्करोगची सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. बऱ्याच वेळा, पुरुष या सुरुवातीच्या लक्षणांना फक्त वृद्धत्वामुळे किंवा किरकोळ संसर्ग म्हणून दुर्लक्ष करतात. पण, ही लक्षणं लवकर ओळखली गेली तर त्यांच्यावर त्वरीत उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे ही लक्षणं लक्षात असू द्या.
मुंबई : जगभरात चिंतेचा विषय ठरतोय तो म्हणजे कर्करोग हा गंभीर आजार. दुर्देवानं आजही त्याबद्दल जागरूकतेचा अभाव आहे, ज्यामुळे वेळेवर निदान होणं आणि योग्य उपचारांमधे अडथळा येतो.
कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक म्हणजे प्रोस्टेट कर्करोग. पुरुषांमधे होणारा एक गंभीर कर्करोग आहे. हा धोकादायक मानला जातो कारण कर्करोग अनेकदा शरीरात शांतपणे पसरत जातो, ज्यामुळे ते ओळखणं कठीण होतं. कर्करोग बहुतेकदा शांतपणे म्हणजेच कुठलीही लक्षणं न दिसता वाढतो त्यामुळे सुरुवातीची लक्षणं अनेकदा दुर्लक्षित केली जातात.
प्रोस्टेट कर्करोगची सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. बऱ्याच वेळा, पुरुष या सुरुवातीच्या लक्षणांना फक्त वृद्धत्वामुळे किंवा किरकोळ संसर्ग म्हणून दुर्लक्ष करतात. पण, ही लक्षणं लवकर ओळखली गेली तर त्यांच्यावर त्वरीत उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे ही लक्षणं लक्षात असू द्या.
advertisement
प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणं - योग्य उपचारांसाठी लक्षणं लवकर ओळखणं आणि योग्य उपचार घेणं अत्यंत महत्वाचं आहे. खाली काही सामान्य लक्षणं दिली आहेत ज्याकडे पुरुष सहसा दुर्लक्ष करतात.
रात्री वारंवार जागं होणं: लघवीसाठी वारंवार जागं व्हावं लागणं.
advertisement
लघवी करताना जोर द्यावा लागणं: लघवी करण्यासाठी जोर द्यावा लागतो, प्रवाह खूप कमकुवत असतो किंवा तो अधूनमधून येतो.
मूत्राशय पूर्ण रिकामं न होणं : शौचालयाचा वापर केल्यानंतरही मूत्राशय पूर्णपणे रिकामं झालं नाही असं वाटणं.
अचानक जोरात दाब आल्यासारखं वाटणं: इतकं तीव्र वाटणं की लघवी रोखणं कठीण होतं.
जळजळ आणि वेदना: लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवणं.
advertisement
लघवी किंवा वीर्यामधे रक्त येणं हे एक गंभीर लक्षण आहे आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
लैंगिक समस्या - स्खलना दरम्यान वेदना होणं.
शरीरदुखी: पाठ, कंबर किंवा ओटीपोटाच्या भागात सतत वेदना.
वजन आणि थकवा: अनावधानानं वजन कमी होणं, अती थकवा जाणवणं किंवा पायांना सूज येणं.
पुरुषांनी सर्व वयोगटात त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथीची काळजी घेणं महत्वाचं आहे, पण वयानुसार ते आणखी महत्वाचं होतं.
advertisement
निरोगी प्रोस्टेटमुळे लघवी सामान्य होते आणि प्रोस्टेट वाढणे किंवा प्रोस्टेट कर्करोगासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. विशेषतः वयाच्या पन्नाशीनंतर स्वतःची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
कुटुंबातील कोणाला प्रोस्टेटची समस्या असेल, तर तुम्ही लवकर चाचणी करून घ्यावी. मूत्रमार्गात किंवा लैंगिक आरोग्यात होणारे कोणतेही किरकोळ बदल किरकोळ वाटले म्हणून दुर्लक्ष करू नका.
advertisement
जी समस्या तुम्हाला किरकोळ वाटते ती कर्करोगाची सुरुवात असू शकते. इथे सांगितलेली कोणतीही लक्षणं दिसली तर लाजू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 8:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : किरकोळ वाटतात म्हणून लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतात गंभीर आजाराचे संकेत






