जाणून घेऊयात या इन्सुलिनच्या झाडाचे फायदे
कॉस्टस इग्नियस ही ही एक औषधी वनस्पती आहे, जी मधुमेहाच्या उपचारात फायदेशीर मानली जाते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नैसर्गिक उपचार म्हणून या झाडाच्या पानांचा वापर इन्सुलिनप्रमाणे होतो म्हणून या झाडाला इन्सुलिनचं झाडं असं सुद्धा म्हणतात.
नेमकं करतं काय ?
इन्सुलिनचं झाडं असं नाव वाचून तुम्हाला असं वाटत असेल की हे झाड इन्सुलिनच्या स्त्रावाला मदत करत असेल तर तसं नाहीये. जे काम इन्सुलिन करतं तेच काम हे झाडं करतं. म्हणजेच या झाडाची पानं खाल्ल्याने किंवा ती धुवून, साफ करून, वाळवून त्यांची पावडर करून खाल्ल्याने रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होते. त्यामुळे या झाडाचं नाव कॉस्टस इग्नियस असं असूनही भारतासह अनेक देशांमध्ये ते इन्सुलिनचं झाड या नावानेच प्रसिद्ध आहे.
advertisement
हे सुद्धा वाचा : डायबिटीसवर गुणकारी आहे पेरूच्या पानांचा चहा
खरंच फायदा होतो का?
अमेरिकेतेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजीच्या अहवालानुसार इन्सुलिनच्या झाडामध्ये वनस्पतीमध्ये विविध पोषकतत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे या झाड्याच्या पानांचं नियमित सेवन केल्याने रक्तातली साखर नियंत्रणात राहू शकते. मात्र यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
आरोग्यासाठी लाभदायक
इन्सुलिनच्या झाडाच्या पानांचं सेवन केल्याने शरीराच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. या पानांमध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणू-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराचं संसर्ग आणि जळजळीपासून संरक्षण होण्यास मदत होते. याशिवाय पानांच्या सेवनामुळे शरीरातून विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते, त्यामुळे यकृताचे कार्य सुधारतं.
हे सुद्धा वाचा : Custard Apple for Diabetes: डायबिटीस आहे तरीही बिनधास्त खा सीताफळ; होतील अनेक फायदे
कसा वापर करावा ?
इन्सुलिनच्या झाडांच्या पानांचा वापर विविध पद्धतीने करता येऊ शकतो. आधी सांगितल्या प्रमाणे ही पानं तुम्ही थेट स्वच्छ करून चावून खाऊ शकता. तुम्हाला जर या पानांची चव आवडली तर या पानांचा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. किवा पानं वाळवून त्यांची पावडर करून खाऊ शकता. मात्र एक लक्षात असू द्या या पानांचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. अद्यापही या पानांच्या उपयुक्ततेवर संधोधन सुरू आहे. त्यामुळे ही पानं फायदेशीर जरी असली तरीही अद्याप ती गोळ्या -औषधांना पर्याय ठरलेली नाहीत. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका जो तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरेल.