TRENDING:

Dark Shower : डार्क शॉवरचा ट्रेंड नेमका आहे तरी काय ? झीरो कॉस्ट थेरपी म्हणजे काय ? डार्क शॉवरमुळे शरीरावर काय परिणाम होतात ?

Last Updated:

सोशल मीडियावर 'डार्क शॉवरिंग' हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. ही विचित्र वाटणारी पद्धत ताण कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी एक संभाव्य उपाय म्हणून वापरली जात आहे. नावाप्रमाणेच, अंधारात किंवा मंद प्रकाशात आंघोळ केल्यानं आपल्या इंद्रियांना शांती मिळते आणि मनाला विश्रांती मिळते असं मानलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नीट झोप न लागणं, अपुऱ्या झोपेमुळे तब्येतीवर परिणाम होणं या समस्या सध्या वाढतायत. व्यस्त जीवनशैलीमुळे निद्रानाशाचं प्रमाण वाढलंय.
News18
News18
advertisement

सोशल मीडियावर 'डार्क शॉवरिंग' हा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. ही विचित्र वाटणारी पद्धत ताण कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी एक संभाव्य उपाय म्हणून वापरली जात आहे. नावाप्रमाणेच, अंधारात किंवा मंद प्रकाशात आंघोळ केल्यानं आपल्या इंद्रियांना शांती मिळते आणि मनाला विश्रांती मिळते असं मानलं जातं.

'डार्क शॉवरिंग' हा फक्त एक ट्रेंड नाही तर आपल्या आयुर्वेद परंपरेतही याचं महत्त्व सांगितलं आहे. ही आयुर्वेदिक पद्धत आहे, झोपण्यापूर्वीच्या आंघोळीनं शरीरच नाही तर मन देखील शुद्ध होतं.

advertisement

Diabetes : मधुमेहींसाठी धोक्याची घंटा, व्यायाम करा, हृदयविकाराला दूर रोखा

व्यस्त जीवनशैलीमुळे, बहुतेकांना झोपेच्या समस्या जाणवतात. बऱ्याच लोकांना कधीकधी निद्रानाश, वारंवार जागं येणं किंवा दिवसभर थकवा यासारख्या समस्या येतात. यासाठी, 'डार्क शॉवरिंग' हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. ही पद्धत मनाला शांत करते. यामुळे कोणत्याही खर्चाशिवाय गाढ झोप लागू शकते म्हणून याला झीरो - कॉस्ट थेरपी म्हटलं जातं.

advertisement

डार्क शॉवरिंगचे फायदे पाहूयात-

झोपेची गुणवत्ता सुधारते - ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी डार्क शॉवरिंग खूप फायदेशीर ठरू शकतं.

Heart Disease :हृदय-धमन्यांचं रिपोर्ट कार्ड, चार पद्धतींमुळे कळेल हृदयाची स्थिती

डार्क शॉवरिंग केल्यानं शरीराचं तापमान वेगाने वाढते आणि आंघोळीनंतर तापमान सामान्य होतं, ज्यामुळे लवकर झोप येण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, अंधारात राहिल्यानं मेलाटोनिन हे झोपेचं संप्रेरक वाढतं, जे मनाला शांत करतं आणि लवकर झोप येण्यास मदत होते. औषधांशिवाय झोपण्याचा हा एक स्मार्ट आणि वैज्ञानिक मार्ग आहे.

advertisement

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर - डार्क शॉवरिंग करण हे ध्यानधारणेसारखे आहे. कारण यामुळे तणाव संप्रेरक कॉर्टिसोल कमी होतं, ज्यामुळे मन शांत करण्यास मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दुसऱ्यांची मनं वाचणारे डॉक्टरच प्रेमात वेडे; घरचा विरोध अन् जातीची भिंत, काय केल
सर्व पहा

डार्क शॉवरिंगमधे कोमट पाणी, साबणाचा सुगंध आणि शॉवरच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित होतं, ज्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते आणि आराम मिळतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dark Shower : डार्क शॉवरचा ट्रेंड नेमका आहे तरी काय ? झीरो कॉस्ट थेरपी म्हणजे काय ? डार्क शॉवरमुळे शरीरावर काय परिणाम होतात ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल