Diabetes : शारीरिक हालचालींचा अभाव ठरु शकतो धोकादायक, हृदयविकाराचा धोका वाढतो, मधुमेहींसाठी धोक्याची सूचना
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मधुमेहींमधे हृदयविकार होण्याचं प्रमुख कारण आणि इतर हृदयरोगांचं एक प्रमुख कारण म्हणजे शारीरिक निष्क्रियता. मधुमेहाचे रुग्ण शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतील तर त्यांच्या मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो असं एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
मुंबई : प्रकृती चांगली ठेवायची तर आहाराबरोबरच व्यायामही महत्त्वाचा असतो. व्यायाम, शारीरिक हालचालींमुळे शरीर सक्रिय राहतं. गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
हीच बाब मधुमेही रुग्णांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण मधुमेहींमधे हृदयविकार होण्याचं प्रमुख कारण आणि इतर हृदयरोगांचं एक प्रमुख कारण म्हणजे शारीरिक निष्क्रियता. मधुमेहाचे रुग्ण शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतील तर त्यांच्या मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो असं एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
भारतासाठी चिंताजनक आकडेवारी -
जर्नल ऑफ स्पोर्ट अँड हेल्थ सायन्समधे प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, भारतातील मधुमेहाच्या रुग्णांमधे हृदयविकाराच्या तेरा टक्क्यांहून अधिक प्रकरणांत शारीरिक हालचालींच्या अभाव जाणवला.
advertisement
9.6 टक्के आर्टरी कोरोनरी डिसीज झालेल्या रुग्णांमधे आणि 9.4 टक्के हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंत केवळ रुग्णांनी पुरेसा शारीरिक व्यायाम किंवा हालचाल करत नसल्यानं होतात असं आढळून आलं.
ब्राझीलमधील रिओ ग्रांडे डो सुल येथील फेडरल युनिव्हर्सिटीच्या संशोधक जेन फेटर यांनी या विषयावर महत्त्वाची माहिती दिली. मधुमेह झाल्यानंतर इतर गुंतागुंतीचे आजार होणारच, असं बरेच जण गृहीत धरतात पण हे खरं नाही.
advertisement
मधुमेही रुग्णांनी शारीरिक हालचाल योग्यरित्या वाढवली तर या गंभीर आजारांचा मोठ्या प्रमाणात रोखता येतील असं जेन फेटर यांनी म्हटलंय. यासाठी, वीस लाख नागरिकांवर संशोधन करण्यात आलं. या अभ्यासासाठी, संशोधकांनी दक्षिण आशियासह जगभरातील विविध प्रदेशांमधील वीस लाखहून अधिक प्रौढ मधुमेह रुग्णांच्या डेटाचं विश्लेषण केलं.
जागतिक स्तरावर, रक्तवाहिन्यांच्या मोठ्या समस्या आणि डोळ्यांच्या आजाराच्या दहापैकी एक प्रमुख कारण निष्क्रियता होतं असं अभ्यासातून आढळून आलं.
advertisement
आजाराचा धोका किती जास्त आहे हे सांगणारी आकडेवारी पाहूया. शारीरिक निष्क्रियतेमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.
स्ट्रोक: दहा टक्क्यांहून अधिक प्रकरणं
डायबेटिक रेटिनोपॅथी: 9.7 टक्के
हृदयविकार: 7.3 टक्के
हृदयविकार: अंदाजे 5 ते 7 टक्के
advertisement
हा धोका कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे व्यायाम. जागतिक आरोग्य संघटनेनं, यासाठी प्रत्येकानं आठवड्यातून किमान दिडशे मिनिटं मध्यम ते जोरदार शारीरिक हालचाली कराव्यात असा सल्ला दिला आहे.
थोडीशी हालचाल मधुमेही रुग्णांना हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या मोठ्या धोक्यांपासून वाचवू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 1:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : शारीरिक हालचालींचा अभाव ठरु शकतो धोकादायक, हृदयविकाराचा धोका वाढतो, मधुमेहींसाठी धोक्याची सूचना









