Processed Food : सिगरेटच्या व्यसनापेक्षा प्रोसेस्ड फूड घातक, संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आकर्षक पॅकिंग, चवीमुळे बिस्किटं, पॅकेज्ड स्नॅक्ससारखे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ म्हणजेच ultra processed food खावंसं वाटत. हे पदार्थ क्वचित खाणं आणि त्याची सवय लागणं या दोन गोष्टींमधे खूप मोठा फरक आहे. कारण ultra processed food चं व्यसन प्रकृतीसाठी घातक ठरु शकतं. आपल्या आरोग्यासाठी हे पदार्थ सिगरेटइतकेच हानिकारक असू शकतात.
मुंबई : सिगरेटची, तंबाखूची सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे, कर्करोगासारखे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात. ही सवय जशी घातक तसंच प्रोसेस्ड फूडचं व्यसन घातक ठरु शकतं. हार्वर्ड विद्यापीठ, मिशिगन विद्यापीठ आणि ड्यूक विद्यापीठाच्या अलीकडील संशोधनात हे सत्य समोर आलं आहे.
आकर्षक पॅकिंग, चवीमुळे बिस्किटं, पॅकेज्ड स्नॅक्ससारखे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ म्हणजेच ultra processed food खावंसं वाटतं. हे पदार्थ क्वचित खाणं आणि त्याची सवय लागणं या दोन गोष्टींमधे खूप मोठा फरक आहे. कारण ultra processed food चं व्यसन प्रकृतीसाठी घातक ठरु शकतं. आपल्या आरोग्यासाठी हे पदार्थ सिगरेटइतकेच हानिकारक असू शकतात.
advertisement
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खास पद्धतीनं तयार केलं जातं, ज्यामधे चव, पोत आणि रसायनं अशा प्रकारे सेट केली जातात की मेंदूला 'हॅपी सिग्नल' जाणवतात असं संशोधनात आढळून आलं आहे. ज्याप्रमाणे सिगरेट ओढल्यानं नशेची भावना निर्माण होते, त्याचप्रमाणे हे पदार्थ वारंवार सेवन करण्याची इच्छा वाढवतात.
अन्न विकणं ही केवळ एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. आपण आंधळेपणाने कमी चरबीयुक्त किंवा साखरमुक्त असं लेबल असलेले पॅकेज खरेदी करतो. पण शास्त्रज्ञांनी या मार्केटिंग पद्धतींचं वर्णन केवळ विक्रीचं साधन असं केलं आहे, जे प्रत्यक्षात आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत.
advertisement
संशोधकांनी, या ट्रेंडची तुलना 1950 च्या दशकातील सिगरेट फिल्टरशी केली आहे. सिगरेट सुरक्षित आहे असं मार्केटिंग करुन कंपन्या त्या विकत होत्या त्याची आठवण संशोधकांनी करुन दिली आहे. हे जसं खरं नव्हतं, त्याचप्रमाणे, आजचं अन्न आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. म्हणून, लेबलवर जे लिहिलंय त्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका.
अनेकांना हे अन्न खाण्याची सवय आणि सिगरेटचं व्यसन यात साम्य आढळतं. ज्यांनी धूम्रपान सोडलं आहे ते बहुतेकदा सिगरेटऐवजी फिजी ड्रिंक्स आणि गोड पदार्थांच्या व्यसनात अडकतात. तंबाखू सोडणं शक्य आहे, पण खाणं हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच संशोधकांना अशा पदार्थांचं व्यसन सिगारेटपेक्षा अधिक धोकादायक वाटतं.
advertisement
व्यसन टाळण्यासाठी काय करता येईल -
तंबाखूच्या विपणन आणि विक्रीवर ज्याप्रमाणे कठोर कायदे करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे अन्न उद्योगावरही कठोर नियम आणि कारवाई केली पाहिजे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या पदार्थांची तुलना थेट निकोटीन म्हणजेच सिगरेटच्या व्यसनाशी करण्याची घाई करू नये.
advertisement
आरोग्य बिघडण्याचं खरं कारण केवळ व्यसन नाही तर हे प्रक्रिया केलेले अन्न आपल्या आहारातून निरोगी पदार्थ पूर्णपणे काढून टाकतंय हे धोकादायक आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 8:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Processed Food : सिगरेटच्या व्यसनापेक्षा प्रोसेस्ड फूड घातक, संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती










