यासाठी आधी यामागची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. शिवाय त्यावर प्रभावी उपाय देखील गरजेचं आहे.
तरुणांमध्ये ब्लड शुगर का वाढतोय?
2023 मध्ये प्रकाशित झालेल्या Indian Journal of Endocrinology and Metabolism च्या एका रिपोर्टनुसार, भारतात 20 ते 29 वयोगटातील 9.3% तरुणांमध्ये Type 2 Diabetes किंवा Pre-diabetes ची लक्षणं दिसून आली आहेत.
advertisement
WHO आणि ICMR च्या अहवालानुसार, 18 वर्षांखालील तरुणांमध्येही आता डायबेटीसचे प्रमाण वाढते आहे, आणि यामागे जीवनशैलीतील चुका हे मुख्य कारण आहे.
'या' 3 चुका वारंवार करतायत तरुण
1. रात्री उशिरा झोपणे आणि झोपेचा अभाव
झोप आणि रक्तातील साखरेचा संबंध खूप खोल आहे. झोपेअभावी शरीरातील इंसुलिन कार्यप्रणाली गडबडते. झोप न झाल्यास मेलाटोनिनचा स्तर कमी होतो, ज्याचा थेट परिणाम इंसुलिन सेन्सिटिव्हिटीवर होतो. रोजच्या दिवसात ही साखर नियंत्रणात राहात नाही.
2. फ्रुट जूस, एनर्जी ड्रिंक्स आणि 'डायट' पेयांचं अति सेवन
फ्रुट जूस आरोग्यासाठी उत्तम वाटतो, पण त्यासाठी पॅकेज फ्रुटज्यूस टाळावेत. त्यात खूप जास्त प्रमाणात साखर किंवा शुगर सिरप असतं, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय हल्लीचे एनर्जी ड्रिंक्स हे खूप गोड असतात, तरुण मुलं कुल दिसण्यासाठी किंवा खूप भारी वाटतं म्हणून असे ड्रिंक पितात पण हे शरीरासाठी हानिकारक आहे.
3. स्ट्रेस आणि शरीरसंचालनाचा अभाव
कॉलेज आणि जॉब प्रेशरमुळे तरुणांमध्ये Cortisol (स्ट्रेस हॉर्मोन) वाढतो. यामुळेही ब्लड शुगर स्तर अनियंत्रित राहतो. आजचे शहरी तरुण स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात आणि व्यायाम मात्र होत नाही. हेच ब्लड शुगरच्या वाढीमागे मोठं कारण आहे.
निदान आणि तपासणी केव्हा करावी?
ICMR आणि ADA च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, 20 वयानंतर एकदा फास्टिंग शुगर + HbA1c टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः जर आपण वर्क फ्रॉम होम, स्ट्रेस किंवा कमी हालचालीचं जीवन जगत असाल तर.
22 वयाचा सौरभ जेव्हा अचानक चक्कर येऊन कोसळला, तेव्हा त्याला कळलं की शरीराला आपण फारसे गांभीर्याने घेतलेच नाही.
आजच्या घडीला, डायबेटीसचं फार कमी वयाच्या मुलांना होऊ लागला आहे. त्यामुळे या वयातील मुलांना वरील 3 चुका टाळण्याची गरज आहे.