TRENDING:

Uric Acid : युरिक अ‍ॅसिड वाढलं तर काय करायचं ? आहारात कोणते बदल करायचे ?

Last Updated:

वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडमुळे संधिवात, उच्च रक्तदाबासारख्या समस्या वाढू शकतात. शरीरात युरिक अ‍ॅसिड जमा होतं तेव्हा सांध्यांमधे खडे जमा होऊ शकतात. यामुळे वेदना होतात आणि सूज येते. यामुळे रक्तदाब असंतुलित होऊ शकतो आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. युरिक अ‍ॅसिड वाढू नये यासाठी, योग्य आहार खूप महत्वाचा आहे. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे युरिक अ‍ॅसिड वाढतं आणि कोणत्या पदार्थांमुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जीवनशैलीतले बदल आणि खाण्याच्या सवयींमुळे, युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. सध्या युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढणं ही समस्या वाढत चालली आहे.
News18
News18
advertisement

वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडमुळे संधिवात, उच्च रक्तदाबासारख्या समस्या वाढू शकतात. शरीरात युरिक अ‍ॅसिड जमा होतं तेव्हा सांध्यांमधे खडे जमा होऊ शकतात. यामुळे वेदना होतात आणि सूज येते. यामुळे रक्तदाब असंतुलित होऊ शकतो आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. युरिक अ‍ॅसिड वाढू नये यासाठी, योग्य आहार खूप महत्वाचा आहे. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे युरिक अ‍ॅसिड वाढतं आणि कोणत्या पदार्थांमुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहतं.

advertisement

Heart Disease : हृदयविकाराचे शरीर देतं संकेत, या लक्षणांबद्दल गल्लत करु नका

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवणारे पदार्थ -

लाल मांस आणि ऑर्गन मीट - - यात प्युरिनचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वेगानं वाढू शकते.

समुद्री खाद्यपदार्थ - सार्डिन, मॅकरेल, अँकोव्हीज, कोळंबी - यातही प्युरीन असतं आणि रक्तदाबावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

advertisement

अल्कोहोल, विशेषतः बिअर - युरिक अ‍ॅसिड पातळी वाढतेच तसंच डिहायड्रेशन होऊन रक्तदाब देखील वाढू शकतो.

साखरयुक्त पेयं आणि फ्रुक्टोज सिरप - सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूसमुळे युरिक अ‍ॅसिड आणि लठ्ठपणा दोन्ही वाढतो.

फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ - यात ट्रान्स फॅट आणि जास्त मीठ असते, हे दोन्ही युरिक अ‍ॅसिड आणि रक्तदाब दोन्हीसाठी हानिकारक असतं.

advertisement

वाढलेलं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी काय खावं ?

कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ - दही आणि स्किम्ड मिल्क - युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.

ताजी फळं - चेरी, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि लिंबू - युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी आणि रक्तदाब राखण्यासाठी मदत करतात.

भाज्या - दुधी भोपळा, झुकिनी, भोपळा, टोमॅटो आणि पालक यासारख्या हिरव्या भाज्या शरीराला विषमुक्त करतात.

advertisement

Skin Care : कोरियन स्किनकेअर रुटिन का आहे चर्चेत ? 4-2-4 रुल का आहे खास ?

धान्य - तपकिरी तांदूळ, ओट्स आणि मिश्रधान्य पीठामुळे रक्तदाब स्थिर करण्यास मदत होते.

सुकामेवा - बदाम, अक्रोड, जवस यामधे चांगले फॅट्स आणि फायबर असतात.

आहारासाठी आरोग्यदायी टिप्स -

तेलकट आणि जास्त तळलेले पदार्थ टाळा, त्याऐवजी वाफवलेले, ग्रिल केलेले किंवा उकडलेले पदार्थ निवडा. जेवणात कमी मीठ आणि कमी सोडियम असलेले मसाले वापरा.

डाळ आणि भाज्या शिजवताना जास्त तेल किंवा तूप वापरणं टाळा.

मीठ जास्त वापरु नका, ते टाळण्यासाठी लिंबाचा रस, हर्बस् आणि मसाल्यांनी चव वाढवण्याचा प्रयत्न करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी मिळत नसल्याने घेतला निर्णय,तरुणाने केली रेशीमची शेती, कमाई तर पाहाच
सर्व पहा

शरीरातून युरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid : युरिक अ‍ॅसिड वाढलं तर काय करायचं ? आहारात कोणते बदल करायचे ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल