श्रीलंकेतील दिवाळी : श्रीलंकेतही दिवाळी भारतासारखीच साजरी होते. घरोघरी मातीचे दिवे लावले जातात. या परंपरेमागची कहाणी माहीत नसली तरी दिवे लावल्यानंतर सगळे एकत्र जेवण करतात.
चीन आणि तैवानमधील दिवाळी : दक्षिण आशियात, चीन आणि तैवानमध्ये दिवाळीसारखाच दिव्यांचा सण साजरा केला जातो, ज्याला 'लँटर्न फेस्टिव्हल' म्हणतात. या सणात दिव्यांऐवजी हवेत तरंगणारे कंदील दिसतात.
advertisement
मलेशियातील दिवाळी : मलेशियात दिवाळीला 'हरी दिवाली' म्हणतात. लोक तेल आणि पाण्याने स्नान करून देवी-देवतांची पूजा करतात. भारतासारखेच इथेही दिवाळीच्या निमित्ताने जत्रा भरतात.
थायलंडमधील क्रिओंग : थायलंडमध्ये दिवाळीसारखा साजरा होणारा सण 'क्रिओंग' म्हणून ओळखला जातो. या दिवशी केळीच्या पानांपासून सुंदर दिवे बनवले जातात आणि त्यात अगरबत्ती ठेवून ते प्रज्वलित केले जातात. हे दिवे काही पैशांसोबत नदीत सोडले जातात.
फ्रान्समधील प्रकाशोत्सव : फ्रान्समध्ये दरवर्षी 8 डिसेंबरला प्रकाशोत्सव साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताची आई मेरी हिचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो. लोक 4 दिवस आपल्या घरासमोर दिवे लावतात.
कॅनडातील दिवाळी : कॅनडात दरवर्षी 5 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाते. भारतासारखेच इथेही दिवे लावले जातात आणि फटाके वाजवले जातात. न्यूफाउंडलँडमध्ये हा सण विशेष उत्साहात साजरा केला जातो.
ज्यूइश लोकांमधील हनुक्का : ज्यूइश लोकांमध्ये साजरा केला जाणारा हनुक्का हा सुद्धा दिवाळीसारखाच प्रकाशाचा सण आहे. यात 8 दिवस आणि रात्री मेणबत्त्या लावल्या जातात. नोव्हेंबरच्या शेवटापासून डिसेंबरपर्यंत हा सण चालतो. 8 मेणबत्त्यांपासून सुरुवात होऊन दिवसेंदिवस मेणबत्त्यांची संख्या वाढत जाते.