ऑरेंजथ्योरी फिटनेसच्या संस्थापक आणि मुख्य अनुभव अधिकारी दृष्टी छाब्रिया यांनी काही जलद आणि प्रभावी डेस्क वर्कआउट्स शेअर केले आहेत, जे तुम्ही सहज करू शकता. तुम्ही सकाळच्या चहानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतरच्या लहान ब्रेक दरम्यान हे व्यायाम करू शकता. हे व्यायाम तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यासोबतच पावसाळ्याच्या आळसातून बाहेर पडण्यासही मदत करतील.
वेदना टाळण्यासाठी आणि उर्जावान राहण्यासाठी करा 5 डेस्क वर्कआउट्स..
advertisement
सिटेड लेग लिफ्ट्स : खुर्चीवर ताठ बसा आणि पाय जमिनीवर ठेवा. आता एक पाय जमिनीला समांतर होईपर्यंत वर उचला, 5 सेकंद थांबा आणि हळू-हळू खाली ठेवा. हा व्यायाम प्रत्येक पायाने 10 वेळा करा. यामुळे तुमच्या शरीराचा खालचा भाग मजबूत होईल.
डेस्क पुश-अप्स : तुमचे हात खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर डेस्कवर ठेवा, थोडे मागे व्हा आणि डेस्कच्या दिशेने पुश-अप्स करा. खाली वाकून पुन्हा वर या. हात आणि छातीसाठी 12 ते 15 रेप्स करा.
सिटेड टॉर्सो ट्विस्ट्स : खुर्चीवर सरळ बसा, हात जोडा आणि शरीराचा वरचा भाग एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळवा. या सोप्या हालचालीमुळे तुमच्या पोटाच्या बाजूचे स्नायू ताणले जातात आणि पाठीच्या कण्याचा लवचीकपणा सुधारतो. प्रत्येक बाजूला 10 वेळा हा व्यायाम करा.
नेक रोल्स : खांदे सैल सोडा, मान पुढे झुकवा आणि हळूहळू गोलाकार फिरवा. ताण कमी करण्यासाठी घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने प्रत्येकी 5 वेळा हा व्यायाम करा.
चेअर स्क्वॅट्स : खुर्चीवरून उठा आणि पूर्णपणे न बसता पुन्हा खाली बसा. पाय आणि ग्लूट्स सक्रिय करण्यासाठी हा व्यायाम 10 ते 12 वेळा पुन्हा करा.
नियमित व्यायामासोबतच, पावसाळ्यात भरपूर पाणी पिणे आणि सकस आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. दुपारच्या जेवणानंतर 15 मिनिटे जलद चालण्यासारख्या हालचालींचा समावेश करा आणि ताण कमी करण्यासाठी तसेच मानसिकरित्या सतर्क राहण्यासाठी माइंडफुल ब्रीदिंग व्यायाम करा. या छोट्या, पण सातत्यपूर्ण सवयींमुळे तुम्ही तुमचा मूड कायम चांगला राहील.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.