कशी साजरी होते धुळवड?
धुळवडीच्या दिवशी गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो, तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा राहतो. दिवसभर तरुण दगड-गोटे जमा करतात आणि सायंकाळी एकमेकांवर जोरदार दगडफेक करतात. दगडांचा अक्षरशः वर्षाव होत असताना अनेक तरुण जखमी होतात. जखमींना दवाखान्यात न नेता देवीच्या अंगाऱ्यावर आणि भंडाऱ्यावर उपचार केले जातात.
advertisement
रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा, पुण्यात विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे’चा जल्लोष, Video
साडेतीनशे वर्षांची परंपरा
ही प्रथा सुमारे शेकडो वर्षांपासून सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. आख्यायिकेनुसार, होळी संपल्यानंतर मध्यरात्री तुळजाभवानी मंदिर येथील आई भवानी दैत्याशी युद्ध करत असताना या गावच्या नदीपात्रातून पुढे गेली. त्या वेळी दैत्य आणि मानव यांच्यात दगडांचे युद्ध झाले. त्याच युद्धाचे प्रतीक म्हणून ही दगडफेकीची परंपरा आजही जपली जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावकऱ्यांच्या मते, जेवढे अधिक लोक जखमी होतील, तेवढा त्या वर्षी पाऊस चांगला पडतो. या श्रद्धेमुळे बहुसंख्य गावकरी जखमी होईपर्यंत दगडफेक सुरूच राहते, असे स्थानिकांनी सांगितले.
दरवर्षी होणाऱ्या या दगडफेकीत अनेक जण जखमी होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तरीही स्थानिकांची श्रद्धा आणि परंपरा कायम असल्याने ही रक्ताची धुळवड आजही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.





