TRENDING:

Makeup Tips : तुमचाही मेकअप काहीवेळाने पॅची होतो? मग टाळा या 3 चुका, मेकअप कधीच होणार नाही खराब

Last Updated:

मेकअप संपूर्ण वेळ चांगला टिकावा यासाठी मेकअप करताना काही चुका टाळायला हव्यात. जेणेकरून मेकअप पॅची होणार नाही आणि अधिककाळ टिकू शकेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महिलांसाठी मेकअप हा त्यांचा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. मेकअपमुळे चेहरा अधिक आकर्षक वाटू लागतो. परंतु हाच मेकअप जर चांगला झाला नाही किंवा काहीवेळाने तो पॅची होऊ लागला तर मात्र चेहरा हा अतिशय भयानक दिसू लागतो. अशावेळी मेकअप संपूर्ण वेळ चांगला टिकावा यासाठी मेकअप करताना काही चुका टाळायला हव्यात. जेणेकरून मेकअप पॅची होणार नाही आणि अधिककाळ टिकू शकेल.
तुमचाही मेकअप काहीवेळाने पॅची होतो? मग टाळा या 3 चुका, मेकअप कधीच होणार नाही खराब
तुमचाही मेकअप काहीवेळाने पॅची होतो? मग टाळा या 3 चुका, मेकअप कधीच होणार नाही खराब
advertisement

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की मेकअप करून एखाद्या समारंभात गेलात, तिकडे थोडा डांस केल्याने घाम आला की चेहऱ्यावरील मेकअप पॅची होऊ लागतो. चेहऱ्यावर डाग दिसू लागतात, डोळ्यांच्या खाली, ओठांजवळ पॅच दिसू लागतात. चेहऱ्याचा मेकअप पॅची होण्याची तीन कारण असतात.

कलर कॅरेक्टर वापरा : मेकअप करताना अनेकदा वेळ वाचवण्यासाठी चेहऱ्यावर लगेचच फाउंडेशन लावले जाते. परंतु घाम आल्यावर किंवा काही वेळाने चेहऱ्याचे प‍िग्‍मेंटेशन तुमचा मेकअप पॅची बनवतो. तेव्हा मेकअपपूर्वी कलर करेक्शन नक्की करा.

advertisement

Health Tips : सुजलेले पाय आणि पांढरी जीभ, शरिरात दिसणारी 5 लक्षण देतात गंभीर आजारांचे संकेत

फाउंडेशनचा लाईट शेड वापरा : ऑनलाईन शॉपिंगच प्रमाण वाढल्याने अनेकदा फाउंडेशन सारखे मेकअप प्रॉडक्ट्स ऑनलाईन मागवले जातात. परंतु लक्षात ठेवा की फाउंडेशन तुम्हाला गोर दाखवण्यासाठी नाही तर चेहऱ्याचा अन-ईवन स्‍क‍िनटोन लपवण्यात आणि क्लिअर स्किन लुक देण्याचे काम करतो. तेव्हा फाउंडेशन नेहमी तुमच्या स्किन टोननुसार निवडावे. तुमच्या स्किन टोन पेक्षा लायटर फाउंडेशन तुमचा मेकअप खराब करू शकते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

फाउंडेशन ऑक्‍सीडाइज होणे : काहीवेळा फाउंडेशन ऑक्‍सीडाइज होऊ लागतो. म्हणजे फाउंडेशन लावल्यानंतर काही वेळाने तो ऑरेंज रंगाचा होऊ लागतो. अशावेळी फाउंडेशन निवडताना हे नक्की पाहा की तो किती वेळाने ऑक्‍सीडाइज होतो. कारण यामुळे देखील काहीवेळानंतर तुमचा मेकअप पॅची होऊ लागतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makeup Tips : तुमचाही मेकअप काहीवेळाने पॅची होतो? मग टाळा या 3 चुका, मेकअप कधीच होणार नाही खराब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल