पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते डबल क्लिंझिंग. तसेच सकाळचे आणि संध्याकाळचे दोन्ही स्किनकेअर रूटीनदेखील खूप महत्त्वाचे असते. अर्थी बाय एलेनझाच्या संस्थापक नफिसा अफनान यांनी तुमच्या सकाळ आणि संध्याकाळच्या रूटीनमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत.
पावसाळ्यात स्किनकेअरसाठी 6 खास टिप्स..
डबल क्लींजिंग : डबल क्लींजिंग हे एक प्रभावी तंत्र आहे. यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्लींजर वापरले जातात. या प्रक्रियेची सुरुवात सहसा ऑइल-बेस्ड क्लींजरने होते, जे मेकअप, सनस्क्रीन आणि त्वचेच्या पृष्ठभागावरील अतिरिक्त सेबम काढून टाकते. त्यानंतर फोमिंग किंवा जेल क्लींजरसारखे वॉटर-बेस्ड क्लींजर वापरून उर्वरित अशुद्धी काढली जाते. छिद्रे बंद होण्यापासून आणि पिंपल्स येण्यापासून रोखण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत आहे.
advertisement
पीएच संतुलित करणारा टोनर : निरोगी त्वचेचा बॅरिअर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते जास्त तेलकटपणा, कोरडेपणा आणि संवेदनशीलता यांसारख्या समस्यांना प्रतिबंध करते. वाढलेल्या आर्द्रतेमध्ये त्वचेचा नैसर्गिक पीएच बॅलन्स राखणारा टोनर वापरल्याने निरोगी स्किन बॅरिअर राखता येतो.
वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर : या हंगामात वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करणे बहुतेक त्वचेच्या प्रकारांसाठी फायदेशीर ठरू शकते. वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर हलके असतात आणि ते त्वचेवर चिकट किंवा जड वाटत नाहीत. ते छिद्रे बंद न करता त्वचेला आवश्यक हायड्रेशन देतात, त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे.
ओठांकडे दुर्लक्ष करू नका : ओठांना आठवड्यातून 1-2 वेळा सौम्य लिप स्क्रबने एक्सफोलिएट केल्याने मृत त्वचा निघून जाते, ओठ फाटत नाहीत आणि ते मऊ होतात. त्यांना मॉइश्चराइज ठेवण्यासाठी तुम्ही दररोज लिप बाम देखील वापरू शकता.
सनस्क्रीन विसरू नका : पावसाळ्यात ढगाळ हवामानामुळे अनेकदा या पायरीकडे दुर्लक्ष केले जाते. पण, हानिकारक यूव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी एसपीएफ 50 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा.
क्ले मास्कचा वापर : जास्त तेल शोषून घेण्यासाठी, छिद्रे स्वच्छ करण्यासाठी आणि अशुद्धी काढण्यासाठी क्ले मास्क खूप प्रभावी असतात. त्यामुळे पावसाळ्यात, जेव्हा आर्द्रतेमुळे त्वचा तेलकट आणि बंद झाल्यासारखी वाटते, तेव्हा ते वापरणे खूप फायदेशीर ठरते. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा क्ले मास्क वापरू शकता.
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे हवामानातील बदलांवर तुमची त्वचा कशी प्रतिक्रिया देते, याकडे लक्ष देणे आणि त्यानुसार तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. या टिप्सचे नियमित पालन केल्यास तुम्ही तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि या ऋतूच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तयार ठेवू शकता.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.